आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माळी समाजातर्फे हेमंत पाटलांच्या कुटुंबीयांना ५० हजारांची मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देश माळी महासंघातर्फे स्वर्गवासी पत्रकार हेमंत पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन येथे शोकसभेचे आयोजन केले होते.
या वेळी माळी समाजाच्या विविध संघटनांतर्फे हेमंत पाटील यांच्या कुटंुबीयांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर करण्यात आले. या वेळी माळी मुरलीधर महाजन, कैलास माळी, प्रकाश महाजन, वसंत पाटील, आत्माराम माळी, संतोष इंगळे, प्रा.डॉ.मुक्ता महाजन, सोमनाथ महाजन, नंदू पाटील, प्रवीण देशमुख, भागवत महाजन, सरिता नेरकर, निवेदिता ताठे, नगरसेवक सुनील माळी आदी उपस्थित होते. मुरलीधर महाजन यांनी पाटील यांच्या मुलाच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाची तर प्रकाश महाजन यांनी शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याची जबाबदारी घेतली.
मनियार बिरादरीतर्फे आर्थिक मदत
स्वर्गवासी हेमंत पाटील यांच्या कुटुंबीयांना जिल्हा मनियार बिरादरीतर्फे ५७८६ रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हेमंत पाटील यांच्या मातोश्रींना नुकताच हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या वेळी बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, उपाध्यक्ष चांद अमिर, अलताफ शेख, रऊफ हाजी आमिर, हारून मेहबूब, युनूस अली आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...