आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malnutrition Decrease News In Rawer, Divya Marathi

रावेरातील कुपोषणग्रस्त बालकांच्या संख्येत घट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावेर - वर्षभरापूर्वी तालुक्यात राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानाला सुरुवात झाली. या अभियानाच्या सुरुवातीला तालुक्यातील साधारण र्शेणीतील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या 25 हजारांच्या घरात होती. मात्र, अभियान यशस्विपणे राबवण्यात आल्याने कुपोषणग्रस्त बालकांची संख्या 22 हजारांवर आली आहे.
अभियान सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील तीव्र कुपोषित बालकांची संख्या 323 इतकी होती. सद्यस्थितीत हा आकडा केवळ 60 इतका र्मयादित आहे. महिला व बालकल्याण प्रकल्पांतर्गत राबवल्या जाणार्‍या राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानात अंगणवाड्यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. तालुकाभरातील 309 अंगणवाड्यांच्या माध्यमातून कुपोषणमुक्तीची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत कुपोषणग्रस्त 0 ते 6 वयोगटातील बालकांना कॅल्शियमयुक्त औषधे, सकस आहार पुरवला जात आहे. तसेच बालकांना दूध, केळी, अंडी असा सकस आहार मिळाल्याने कुपोषणाचा विळखा काहीअंशी कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पालकांमध्ये जनजागृती करण्यासोबतच वेळोवेळी लसीकरण, जीवनसत्वाचे डोस, जंतनाशक औषधांचा वापर या बाबींवर भर दिला जात आहे. तालुक्यातील 24 हजार बालकांच्या पालकांना नुकतेच जंतनाशक औषधे आणि जीवनसत्वयुक्त औषधांचे वाटप करण्यात आले आहे.
कुपोषणमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रमांवरही भर दिला जात आहे. कुपोषित बालकांची नियमित तपासणी करून वेळोवेळी नोंदी ठेवल्या जात आहेत. कुपोषणग्रस्त बालकांसाठी आवश्यक असलेल्या आदर्श आहार पद्धतीबाबतही पालकांना मार्गदर्शन केले जात आहे.
अथक प्रयत्नांना यश आले
कुपोषणमुक्तीसाठी बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. या उपक्रमांनुसार कुपोषणमुक्तीचे प्रयत्न केले जात आहेत. या मुळे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात यश आले आहे. डी. एम. देवरे, सहायक गटविकास अधिकारी, रावेर
अशी आहे यंत्रणा
तालुक्यातील 309 अंगणवाड्यांच्या अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या माध्यमातून 24 हजार बालकांना पोषण आहार दिला जात आहे. यासाठी दरमहा तीन ते चार कोटींचा खर्च शासनातर्फे केला जातो. यासोबतच महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
दोन प्रकारात वर्गवारी
दंडाचा घेर, बालकाचे वय आणि वजन या माध्यमातून कुपोषणग्रस्त बालकांची दोन प्रकारात वर्गवारी केली जाते. कमी वजनाची आणि तीव्र कमी वजनाची अशी वर्गवारी करून त्यानुसार आहार व औषधांचे नियोजन केले जाते. वर्गवारीनुसार बालकांना जीवनसत्वे, लोहयुक्त औषधांच्या गोळय़ा, जंतनाशके यांचा पुरवठा केला जात आहे.
वर्षभरापूर्वी 25 हजार बालके होती कुपोषित