आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुपोषणावर शोधून काढली २०० कारणे, मेळघाटापासून कुपोषणाची समस्या आली पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- इतरराज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कुपोषणाची समस्या अधिक आहे. मात्र, मागील २० वर्षांत त्याचे प्रमाण काही अंशी कमी झाले आहे. मेळघाटातील कुपोषणावर उपाय शोधण्यासाठी २०० कारणे शोधून काढली आहेत. त्याची सोडवणूक करण्याचे काम सुरू आहे, असे मत मेळघाटातील समाजसेवेत मोठे योगदान असलेल्या डॉ. रवींद्र कोल्हे यांनी मुलाखतीद्वारे व्यक्त केले. या वेळी त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता कोल्हे ह्यादेखील उपस्थित होत्या. बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याख्यानासाठी हे दांपत्य आले होते. महाविद्यालयापासून समाजसेवेची आवड होती. त्यासाठी आई-वडील, माझे शिक्षक आणि मित्रांची मदत लाभली.

१२ वीत गणितात पैकीच्या पैकी गुण होते, त्यानुसार अभियांत्रिकीला जाता आले असते. पण तेथे मशीनसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. माणसांसोबत राहण्याची आवड असल्याने वैद्यकीय क्षेत्र निवडले. मेळघाटात वैद्यकीय सेवा सुरू केली. तेव्हा एक रुपया तपासणी फी घेतली. आता ती दोन रुपये केली आहे. आपण समाजाला कशा प्रकारे सेवा देतो, हे महत्त्वाचे आहे. मेळघाटापासून कुपोषण पुढे आले. महाराष्ट्र इतर राज्यात प्रगत असतानाही मागासलेलाच आहे. मेळघाटात २० वर्षांपूर्वी दर हजारीमागे एक वर्षाच्या वयापर्यंत २०० बालकांचा तर पाच वर्षांपर्यंत ४०० बालकांचा कुपोषणाने मृत्यू होत होता. ती स्थिती आज कमी झाली असली तरी आजही बालकांच्या मृत्यूचे प्रमाण सुरूच आहे. ही गोष्‍ट धक्कादायक आहे.
सेवा हेच ध्येय
डॉ.स्मिता कोल्हे म्हणाल्या की, वकिली क्षेत्रात वेळप्रसंगी खोटे बोलावे लागते, म्हणून ऐनवेळी पुन्हा दहावीच्या बेसवर बीएचएमएसला प्रवेश घेतला. सात वर्षांचा कोर्स चार वर्षांत पूर्ण केला. एकाचवेळी दोन्ही कोर्स पूर्ण केले. राष्ट्रासाठी काहीतरी करायचे, ही जिद्द मनाशी बाळगून युवतींनी स्वत:ला कणखर बनवायला हवे. आजवर आम्ही एकही संस्था स्थापन केली नाही. फक्त सेवा करत आहोत.