आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : ट्रॅव्हल्सच्या धडकेने दुचाकीस्वार ठार; 100 मीटरपर्यंत नेले फरपटत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅव्हल्सखाली दबलेली राहुल खंडारे यांची दुचाकी. - Divya Marathi
ट्रॅव्हल्सखाली दबलेली राहुल खंडारे यांची दुचाकी.
जळगाव - महामार्गावरी लमानराज पार्कजवळ मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता एरंडाेलकडून येणाऱ्या भरधाव खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीस्वाराला मागून धडक देत १०० मीटरपर्यंत फरपटत नेले. यात दुचाकीस्वार एेनपूर महाविद्यालयाचा ग्रंथपाल जागीच ठार झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल्सचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला लावून धूम ठाेकली. त्याला नागरिकांनी पकडण्याचा प्रयत्न केला; पण ताे सापडला नाही. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालकाच्या विराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. 

एेनपूर (ता.रावेर) येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयात राहुल भिकाजी खंडारे (वय ३०) हे ग्रंथपाल हाेते. ते मूळचे बाळापूर (जि. अकाेला) येथील रहिवासी हाेते; परंतु काही वर्षांपासून ते वाघनगरात पत्नी पूनम (२५) मुलगी साक्षी (वय ४) यांच्यासह राहत हाेते. राहुल मंगळवारी दुपारी महाविद्यालयाच्या कामानिमित्ताने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात गेले हाेते. सायंकाळी वाजता ते काम संपवून दुचाकीने (क्रमांक एमएच-१९/बीसी-८९४५) घराकडे येत हाेते. गुजराल पेट्राेलपंप पार केल्यानंतर मानराज पार्कजवळील नवजीवन मेगा मार्टसमाेर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या ट्रॅव्हल्सने (क्रमांक एमएच-१९/वाय-५०९१) मागून जाेरदार धडक दिली. यात ट्रॅव्हल्सचालकाने दुचाकीस्वाराला १०० मीटरपर्यंत फरपटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून चालकाने धूम ठाेकली. या वेळी ट्रॅव्हल्समागून येणाऱ्या अपघात पाहणाऱ्या काही दुचाकीस्वारांनी चालकाला पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ताे पसार झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिकेला फाेन करून खंडारे यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. मात्र, त्या ठिकाणी अापत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घाेषित केले. याप्रकरणी जिल्हापेठ पाेलिस ठाण्यात ट्रॅव्हल्सचालकाच्या विराेधात गुन्हा दाखल केला अाहे. खंडारे यांची सासरवाडी सिंधी काॅलनीतील अाहे. त्यांचे सासरे के. एल. हिराेळे हे एेनपूर महाविद्यालयात प्राध्यापक अाहेत. 
 
कुटुंबीयांना बसला धक्का 
घटनास्थळी सिव्हिलमध्ये एेनपूर महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक विद्यार्थ्यांनी गर्दी केली हाेती. त्यांनी राहुल यांच्या नातेवाइकांना घटनेविषयी माहिती दिली. काही मिनिटांनी घरी येताे, असे सांगितल्यानंतर राहुल यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना कळल्यावर सुरुवातीला त्यांचा विश्वास बसला नाही. मात्र, सिव्हिलमध्ये येऊन बघितल्यानंतर त्यांना माेठा धक्का बसला. दरम्यान, १२ दिवसापूर्वी राहुल यांनी त्यांची मुलगी साक्षी हिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला हाेता. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, पीएच.डी. करण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...