आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण करून सोनसाखळी लांबवण्याचा चोरट्यांचा नवा फंडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भररस्त्यावर, अंगणात, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सोनसाखळी चोरी करण्याची हिंमत चोरट्यांमध्ये वाढली आहे. शहरात वीस दिवसात दोन घटना अशा झाल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर फिरणे महिलासाठी धोकेदायक झाले आहे. तरी देखील पोलिस प्रशासनाला चोरट्यांचा बंदोबस्त करण्यास अद्याप यश आलेले नाही.

रात्रीच्या अंधारात सोनसाखळीचोरीचा उच्छाद माजविणार्‍या चोरांनी आता मारहाण करून भरदिवसा चोरी करणे सुरू केले आहे. आकर्षक मोटारसायकल, अंगात आकर्षक कपडे, खांद्यांवर सॅक अशा पेहरावात वावरत असलेले हे चोरटे प्रथमदर्शनी महाविद्यालयीन युवक असल्याचे भासवतात. कोणत्या न कोणत्या करणाने महिला, वृद्ध महिलांशी संवाद साधत, क्षणातच त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढतात. एकापेक्षा जास्त चोरट्यांचा या घटनेत समावेश असतो. अत्यंत नियोनबद्धरीत्या सोनसाखळी लांबवणार्‍या या चोरट्यांना अंकुश बसवणे म्हणजे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून पोलिसांनी या चोरट्यांना त्वरित जेरबंद करावे, अशी मागणीहोत आहे.

घराच्या अंगणापर्यंत पोहोचले चोरटे
सोनसाखळीचोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी सूचना लावल्यात, रामानंदनगर पोलिस ठाण्यातर्फे रिक्षा फिरवून महिलांनी कशी काळजी घ्यावी याची दवंडी पिटली. मात्र चोरट्यांच्या नवीन पद्धतीत सार्वजनिक ठिकाणी, रात्रीच्यावेळी चोरी करण्याचा प्रकार दिसून येत नाही. आता हे चोरटे सरळ घराच्या अंगणापर्यंत पोहोचले आहेत.

केस 2
दिनांक : 16 जानेवारी 2014 वेळ : सायंकाळी 5.45 वाजता स्थळ : पद्मालय भोजनालय, जिल्हापेठ
घटना : नीलिमा कुरंगे या वयोवृद्ध महिला पद्मालय भोजनालयात गेल्या होत्या. तेथे 20 वर्षाचा युवक आला. त्याने पाणी प्यायचे कुठे आहेअसे हिंदीमध्ये आजींना विचारले. आजींनी त्याला किचनकडचा रस्ता दाखवला. याच क्षणी त्या युवकाने आजींच्या गळ्यातील सोनसाखळी तोडली. आजींनी प्रतिकार केल्यानंतर या चोरट्याने त्यांना 15 फूट फरपटत नेले. यात त्यांचा हात फ्रॅर झाला. त्याचा साथीदार बाहेर दुचाकी सुरू करून उभा होता. ते 30 ग्रॅम वजनाची सोनसाखळी घेऊन दोघे पसार झाले.

केस 1
दिनांक : 31 डिसेंबर 2013 वेळ : सकाळी 7.45 वाजता स्थळ : विजय कॉलनी, गणेश कॉलनी परिसर
घटना : सुमित्रा गोविंदा वाणी (वय 62) या अंगण झाडत असताना 25-30 वष्रे वयोगटातील दोन मोटारसायकलस्वार आले. त्यांनी आमची आजी आजारी आहे. दान करायचे आहे, दत्त मंदिर कोठे आहे अशी विचारणा केली. क्षणातच सुमित्रा वाणी यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोन्ही प्रकारांमधील चोरट्यांचे वर्णन घेतले आहे. तपास अधिकार्‍यांना तशा सूचना दिल्या आहेत. लवकरच यातील चोरटे अटक करण्यात येतील. - प्रशांत बच्छाव, पोलिस उपअधीक्षक