आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमार्गासाठी डॉ. भामरेंचे मोदींना साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग कोणत्याही स्थितीत झाला पाहिजे. त्यासाठी मार्ग काढा, असे साकडे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले.

दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी खासदारांची विशेष बैठक झाली. त्यात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांनी चर्चा केली. याप्रसंगी खासदार डॉ. भामरे यांनी चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असलेल्या मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न मांडला. हा मार्ग कोणत्याही स्थितीत झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली.
या वेळी डॉ. भामरे यांनी या मार्गाचे महत्त्व सांगून तो मार्ग होणे कसे गरजेचे आहे, याबाबत मुद्दे मांडले. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोबतच्या अधिका-यांना काही सूचना केल्या. या मार्गासाठी दिल्ली-मुंबई कॉरिडॉरवरही खासदारांनी लक्ष वेधले.
त्यांनी औरंगाबादचे उदाहरण देऊन तेथे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असून, धुळ्यातही त्याची सुरुवात झाली पाहिजे, असा आग्रह धरला. त्याला पंतप्रधानांनी सकारात्मकता दर्शविली. तर रेल्वेमार्गाचा विषय पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्याने त्यांच्याकडून या मुद्द्यात जातीने लक्ष देण्यात येईल, अशी आशा डॉ. भामरे यांनी व्यक्त केली आहे.