आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमाड-साक्री रेल्वेमार्गाला हिरवा कंदील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा - मनमाड-इंदौर रेल्वेमार्ग पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मनमाड-मालेगाव-सटाणा-साक्री-चिंचपाडा या नवीन रेल्वे मार्गासही केंद्र सरकार अनुकूल असल्याची माहिती खासदार प्रताप सोनवणे यांनी दिली. या मार्गाच्या अर्ध्या खर्चासाठी महाराष्ट्र शासनाने आर्थिक तरतूद केली आहे. मध्यप्रदेश सरकारनेही उशिरा का होईना तरतूद केली आहे. त्यामुळे या वर्षी सादर होणा-या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.