आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या; बागायती कापसाची लागवड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - यंदाच्या खरीप हंगामात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. 2 हजार 150 हेक्टर संभाव्य क्षेत्रापैकी केवळ 350 हेक्टर क्षेत्रावर बागायती कापसाची लागवड झाली आहे. यंदा सोयाबीनचे क्षेत्र घटणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, यंदा कापसाचे क्षेत्र वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळ तालुक्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने खरीप हंगामातील बागायती पूर्वहंगामी कापसाची लागवड अत्यल्प आहे. 2 हजार 150 हेक्टरपैकी केवळ 350 हेक्टरवर पेरणी झाली. वाघूर धरणातून आवर्तन मिळाल्याने वराडसीम, वांजोळा आणि सुनसगाव या भागातही यंदा बागायती कापूस लागवड वाढली. गेल्या वर्षी भुसावळ विभागात 3 जून रोजी पावसाने हजेरी लावली होती. पूर्वमोसमी पावसामुळे जूनच्या दुसºया आठवड्यात पेरण्यांना गती मिळाली होती. 21 जूनअखेरीस भुसावळ तालुक्यात तब्बल 24 हजार 726 हेक्टर क्षेत्रावर अर्थात 85 टक्के लागवडीयोग्य जमिनीवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. तालुक्यात 21 जूनअखेरपर्यंत 137.31 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात मात्र पावसाचा थेंबही कोसळला नसल्याची स्थिती आहे. गेल्या वर्षी अधिक पावसामुळे कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे यंदाच्या हंगामात कापसाची जागा सोयाबीन घेणार, अशी स्थिती होती. गेल्या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र 1 हजार 692 हेक्टर होते. यंदा बियाण्यांच्या तुटवड्यामुळे हेच क्षेत्र कायम राहील, असा अंदाज आहे. यामुळे यंदाही कापूस अधिक प्रमाणात असेल. तालुक्यातील एकूण पेरणीयोग्य क्षेत्र 27 हजार 357 हेक्टर आहे. यातील तब्बल निम्मे अर्थात 14 हजार 87 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होणार आहे. उडीद, मूग, तूर व्यतिरिक्त अन्य कडधान्याची पेरणी 211 हेक्टरवर होईल.
पीकविम्याचा होणार लाभ
यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने हवामानावर आधारित खरीप पीकविमा योजना सुरू केली आहे. जळगाव जिल्ह्याचा या योजनेत समावेश आहे. पावसाचा खंड, कमी-अधिक पाऊस यापासून शेतकर्‍यांना विमा संरक्षण मिळणार असल्याने हा विमा शेतकर्‍यांसाठी लाभदायी ठरणार आहे.
1100 हेक्टरवर स्वदेशी कापूस
एकीकडे बागायती किंवा जिरायती क्षेत्रावर बिटी कापसाची लागवड वाढत असतानाही स्वदेशी कापसाला भाव अधिक प्रमाणात मिळत असल्याने लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. तालुक्यात तब्बल 1100 हेक्टर क्षेत्रावर देशी कापूस लागवड होण्याचा अंदाज आहे. यात स्वदेशी 5 हे वाण 700 हेक्टर तर अंबिका 12 हे वाण 400 हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याची आशा कृषी विभागाला आहे.

धूळ पेरणीचा धोका टाळा
४सिंचनाची सोय असलेल्या भागात बागायती पेरणी सुरू आहे. शेतकर्‍यांनी खरीप हंगामासाठीच्या विम्याचा लाभ घेतल्यास संभाव्य नुकसानीच्या तुलनेत भरपाई मिळेल. जोरदार पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करणे टाळावे. धूळ पेरणीचा धोका पत्कारू नये.
श्रीकांत झांबरे, कृषी अधिकारी, भुसावळ

खरीप हंगामाचे नियोजन

पिकाचे नाव - संभाव्य पेरणी

ज्वारी 3543
मका 3530
उडीद 2454
मूग 1038
तूर 472
सोयाबीन 1692
भुईमूग 304
तीळ 301
कापूस जिरायती 12360
कापूस बागायती 2120