आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१४ मार्गांच्या वाहतुकीत बदल; अाठ मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात बुधवारी क्रांती मूकमाेर्चा काढला जाईल. माेर्चामुळे वाहतुकीची काेंडी तसेच कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी प्रमुख १४ मार्गांवरील वाहतूक इतरत्र वळवण्यात अाली अाहे. त्यापैकी अाठ मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी राहील. इतर मार्गांवर केवळ माेर्चासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार अाहे. बुधवारी एसटी महामंडळाच्या बसेससाठीही शहराबाहेरील मार्गाचा वापर केला जाणार अाहे, अशी माहिती पाेलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी दिली.
या माेर्चात लाखाेच्या संख्येने नागरिक सहभागी हाेण्याची शक्यता लक्षात घेऊन पाेलिस प्रशासनाने हे बदल केले अाहेत. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे अावाहनही करण्यात अाले अाहे. पाराेळा राेडवरील शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय अाणि शिवतीर्थापर्यंत हा माेर्चा काढला जाईल. माेर्चासाठी शहरासह जिल्हाभरातून विविध वाहनातून नागरिक येतील. त्यामुळे काेणत्याही प्रकारची वाहतुकीची काेंडी हाेऊ नये, नागरिकांची गैरसाेय टळावी या उद्देशाने शहरातील वाहतूक मार्गाचे रूट बदलण्यात अाले अाहेत. शहरातील मार्गावर करण्यात अालेल्या बदलाबाबतची माहिती जनतेला व्हावी यासाठी पाेलिस प्रशासनाकडून प्रसार माध्यमांना त्याची माहिती दिली गेली अाहे. सदर बदल हे बुधवारी सकाळी ते सायंकाळी वाजेपर्यंत लागू राहणार अाहेत. त्यात वरखेडी राेड, चाळीसगाव चाैफुली, साेसायटी पेट्राेल पंप (पाण्याची टाकी) जवळील राेड, चक्करबर्डी राेड, जुना टाेल नाका, साक्री बायपास, अभियंता नगर हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात अाले अाहेत. तर बदल करण्यात अालेल्या मार्गावर केवळ माेर्चासाठी येणाऱ्या वाहनांना प्रवेश दिला जाणार अाहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा माेर्चाच्या काळात महत्त्वाच्या कामाशिवाय शहरात येऊ नये, असे अावाहन पाेलिस प्रशासनाकडून करण्यात अाले अाहे.

०४ ठिकाणीअसेल पुरुषांचा थांबा
०२ठिकाणीअसेल महिला थांबा
अत्यावश्यक सेवेला बंधन लागू नाही...
पाेलिसप्रशासनाने केलेल्या नियाेजनानुसार माेर्चाच्या िदवशी १४ मार्गांवरील बदलानुसार वाहनांना प्रवेश िदला जाणार अाहे. मात्र सदर बंधने हे पाेलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचे वाहन यांना लागू राहणार नाही. गरजेनुसार संबंधित वाहनांना या मार्गाचा वापर करता येईल.

बसेस चिताेड चाैफुलीवरून येतील जातील...
माेर्चाच्या दिवशी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरून सुटणाऱ्या अाणि इतर ठिकाणाहून येणाऱ्या तसेच जिल्हाभरातून शहरात येणाऱ्या बसेस ह्या शहराबाहेरील मार्गाचा वापर करतील. त्यात महामार्गावरून चिताेड चाैफुलीकडून फाशीपूलमार्गे शहरातील बसस्थानकात येतील त्याच मार्गाने शहराबाहेर पडतील, असे नियाेजन प्रशासनाकडून करण्यात अाले अाहे.

बदल करण्यात अालेले मार्ग असे
}नगावबारी, नरडाणा चाैफुली (केवळमाेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
}बिलाडी चाैफुली हायवे (केवळमाेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
}वरखेडी राेड (सर्वप्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी)
}पाराेळा चाैफुली हायवे (फक्तमाेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
}चाळीसगाव चाैफुली (फक्तमाेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
}रेसिडेन्सीकडून येणारा मार्ग (फक्तमाेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
}साेसायटी पेट्राेल पंप‑जलकुंभ (सर्ववाहनांना प्रवेशबंदी)
}चक्करबर्डी राेड (सर्ववाहनांना प्रवेशबंदी)
}चितोड चाैफुली (एसटीबस शिवाय इतर वाहनांना प्रवेशबंदी)
}जुना टाेल नाका, साक्री बायपास (सर्ववाहनांना प्रवेशबंदी)
}साक्री बायपास चाैफुली (सर्ववाहनांना प्रवेशबंदी)
}स्टेडियम वाडीभाेकर राेड (फक्त माेर्चाच्या वाहनांना प्रवेश)
बातम्या आणखी आहेत...