आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Drama Performance,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती सगळे उचापती’ नाटकाने झाला प्रारंभ, सदानंद, काका अन‌् पुष्पाने केली धमाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; मराठीरंगभूमीवर गेल्या एक तपापासून धमाल उडवून देणाऱ्या अन् रसिकांना हसून-हसून लोटपोट करणा-या ‘पती सगळे उचापती’ या नाटकाने जळगावकरांना मनसोक्त हसवले. खच्चून भरलेल्या सभागृहात चेतन दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रसिकांना खिळवून ठेवले. नाटकातील सदानंद कराडे, पुष्पा, श्रद्धा, विक्की, काका अंजू या पात्रांनी सादर केलेली विनोदाची धमाल रसिकांची दाद मिळवून गेली.
‘दिव्य मराठी’च्या वर्धापन दिन उत्सवात शनिवारी सायंकाळी वाजता जेडीसीसी बँक सभागृहात ‘पती सगळे उचापती’ नाटकाचा प्रयोग आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापौर राखी सोनवणे, अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात उद्योगपती रजनीकांत कोठारी यांच्या हस्ते झाले. या वेळी ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड विलास जैन उपस्थित होते. डेप्यूटी एडिटर त्र्यंबक कापडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र देशमुख यांनी केले. चेतन दळवी, अर्चना कुबेर, सौरभ पारखे, हृषीकेश बाम, नीना दोंदे, सुधांशू पानसे आरती पाठक या कलावंतांनी या नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. नाटकात विक्की, त्याची प्रेयसी श्रद्धा, मोलकरीण पुष्पा, शेजारी वाघमारे, काका सुंदर गोडबोले, मित्र सदानंद कराडे त्याची पत्नी अंजली अशी प्रमुख पात्रे होती. सासूच्या त्रासाला कंटाळून दारुडा झालेला वाघमारे रात्री झोपण्यासाठी खिडकीतून विक्कीच्या घरात प्रवेश करतो. अशातच विक्कीकडे मुक्कामाला आलेला त्याचा मित्र सदानंद कराडे (चेतन दळवी) आणि त्याची बायको अंजू प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात. विक्कीच्या घरात रात्री रक्त पिऊन डास मधमाशांएवढे, तर ढेकूण कासवाएवढे झाल्याचे सांगताना त्याने केलेल्या अभिनयाला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. विक्कीच्या घरी मुक्कामाला असलेला सदानंद आणि त्याची पत्नी अंजली यांच्यातील संवादांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवले. सोबत विक्कीची मोलकरीण पुष्पाचे मर्दानी संवाद, त्याला सदानंद, विक्की आणि अंजलीकडून मिळणारा प्रतिसाद अप्रतिम होता. या वेळी नवरा-बायको, मित्र-प्रेयसी यांच्यातील संवाद धमाल उडवतात. रात्री ९.२०पर्यंत चाललेल्या, समज-गैरसमजावर आधारीत या फार्सिकल नाटकाचा मनमुराद आनंद जळगावकर रसिकांनी लुटला.