जळगाव- अादिवासींच्या जीवनावर प्रकाश टाकणारा, त्यांचे दु:ख, समस्या मांडणारा. तसेच देशातील समाजव्यवस्थेची ढासळलेली मानसिकता, रूढी-परंपरा अंधश्रद्धा यांच्या नावाखाली भरवण्यात येणारी जातपंचायत अाणि त्यात विनाकारण भरडली जात असलेली निष्पाप जनता अादी विषयांना हात घालत ‘दंडित’ हा मराठी चित्रपट पहूर येथील अशाेक माळी यांनी तयार केला अाहे. या चित्रपटाचे जळगाव जिल्ह्यासह काेल्हापूरला चित्रीकरण झाले असून अाॅगस्टमध्ये ताे प्रदर्शित हाेणार अाहे.
पहूर (ता.जामनेर) येथील अशाेक माळी यांच्या ‘दंडित’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकचे अनावरण नुकतेच मुंबईत झाले. या चित्रपटाच्या प्रीमियर लवकरच जळगावासह पुणे, मंुबई, काेल्हापूरसह येथे हाेणार अाहे.
चित्रपटात मांडलेला विषय छान : खडसे
चित्रपटाच्याफर्स्ट लूकचे अनावरण महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात अाले. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अशाेक माळी, कलावंत, युनिट सदस्य, समीर दीक्षित उपस्थित हाेते. या वेळी खडसे यांनी एका वेगळ्या विषयाला या चित्रपटातून हात घातला असून सर्व विषय छान अाहे. तसेच अाज समाजप्रबाेधनाची गरज असल्याचे सांगितले.
माेठी स्टारकास्ट
चित्रपटात अशाेक समर्थ, अशाेक शिंदे, मंगेश देसाई, मेघा घाडगे, निशा परुळेकर, अनिकेत केळकर स्नेहल दांडेकर यांच्यासारखे नावाजलेले कलाकार प्रमुख भूमिकेत अाहेत. तसेच सुरेश वाडकर, देवकी पंडित, उत्तरा केळकर स्वप्निल बांदाेडकर यांच्यासारख्या प्रसिद्ध गीतकार-संगीतकारांचा समावेश अाहे. निर्मिती दिलीप पाटील, रवी नवाल प्रमाेद बऱ्हाटे यांनी केली अाहे.