आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाेकांचा नसला तरी तुमच्या सरकारचा ‘टीव्ही’वर विश्वास, खडसेंचा तावडेंना चिमटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - ‘टीव्हीवर ब्रेकिंगच्या नावाखाली दाखवले जाणारे सर्वच खरे असते अन‌् सर्वच खाेटेही नसते’, असे विधान शिक्षणमंत्री विनाेद तावडेंनी नागरिकांसह विद्यार्थ्यांना उद्देशून केले. हाच धागा पकडून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी ‘लाेकांचा नसला, तरी तुमच्या सरकारने टीव्हीवरच्या विषयावर विश्वास ठेवलाच ना,’ अशा शब्दांत त्यांना चिमटा काढला. निमित्त हाेते रविवारी यावल तालुक्यातील फैजपुरात अायाेजित शैक्षणिक कार्यक्रमाचे.

म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या शताब्दी महाेत्सवाचे उद‌्घाटन रविवारी झाले. त्यात चाैफेर फटकेबाजी करताना शिक्षणमंत्री तावडे यांनी शिक्षण, समाजकारण, राजकारण अादी विषयांवर मार्मिक मते व्यक्त केली. ‘किती जणांना वाटतेय की, राजकारणात अाले पाहिजे?’, असा प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना केला. एक ते दीड हजारांपैकी केवळ तीन विद्यार्थ्यांनी हात उंचावून त्यांच्या प्रश्नाचे उत्तर दिले. त्यानंतर ‘टीव्हीवर सातत्याने ब्रेकिंग न्यूज म्हणून शेकडाे, हजाराे काेटींचा भ्रष्टाचार, गैरव्यवहार असे विषय दाखवले जातात. त्यात काही विषयात जरी तथ्यांश नसला तरी ‘हॅमरिंग’मुळे ते खरे वाटायला लागतात. म्हणूनच राजकारणाकडे तिरस्काराने पाहण्याचे प्रमाण वाढले अाहे’, असे मतही तावडेंनी मांडले.
त्यानंतर एकनाथ खडसेंचे भाषण झाले. चेहऱ्यावर स्मित हास्य करून अन‌् शिक्षणमंत्री तावडेंवर नेत्रकटाक्ष टाकून ‘लाेकांचा नसला, तरी तुमच्या सरकारने टीव्हीवरच्या विषयावर शेवटी विश्वास ठेवलाच ना’, असं विधान करून खडसेंनी अापल्या मानत अनेक महिन्यांपासून असलेली मंत्रिपद गेल्याची खदखद अप्रत्यक्षपणे मांडली. व्यासपीठ व सभामंडपातील उपस्थितांचे चेहरे काहीअंशी प्रश्नार्थक झाल्याचे लक्षात येताच मात्र, खडसेंनी ‘अापले सरकार’ असा उल्लेख जाेरकसपणे केला. त्यानंतर सभामंडपात हास्याचे फवारे उडाले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, सरस्वती-लक्ष्मीचं भांडण नकाे
बातम्या आणखी आहेत...