आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर सुरू होताच मोबाइलमध्ये फोटो काढून फोडली मराठीची प्रश्नपत्रिका, पोलिसांवर दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पेपरसुरू झाल्यानंतर काही वेळातच थेट परीक्षा केंद्राच्या इमारतीवर चढून मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेचा फोटाे काढून दहावीची प्रश्नपत्रिका फोडल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी घडला. सोमवारी मुंबईमध्ये बारावीची प्रश्नपत्रिका फोडल्यानंतर मंगळवारी जळगाव शहरात दहावाची प्रश्नपत्रिका फोडण्यात आली. हा प्रकार ‘दिव्य मराठी’च्या छायाचित्रकाराने कॅमेऱ्यात कैद केला अाहे. यामुळे शिक्षण विभागापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. 
 
दहावीचा मंगळवारी पहिलाच मराठीचा पेपर होता. पहिल्याच दिवशी वर्गात कॉपीबहाद्दर तर वर्गाबाहेर टवाळखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला. पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत टवाळखोरांची मजल गेली. त्यात अँग्लो उर्दू शाळेत पेपरफुटीचा प्रकार घडला. दुपारी ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर काही मिनिटातच एक टवाळखोर शेजारच्या दुकानावर चढून इमारतीच्या वर्गखोलीच्या खिडकीजवळ पोहोचला. वर्गात बसलेल्या मुलाने प्रश्नपत्रिका त्याच्या दिशेने दाखवली.
 
यानंतर बाहेरच्या मुलाने मोबाइलमध्ये फोटो काढला. फोटो काढल्यानंतर हा मुलगा माघारी आला. खाली अाल्यानंतर त्यांनी फोटोतील प्रश्नपत्रिकेवरून काॅपी तयार करून वर्गखोल्यांमध्ये पोहोचवली. तसेच मोबाइलमधील प्रश्नपत्रिकेचा फोटो व्हायरल करून कॉपी करण्यासाठी सर्वच टवाळखोरांना मदत केली. सोशल मीडियाचा सोयीस्करपणे गैरवापर करून प्रश्नपत्रिका फोडल्याचे हे उदाहरण जळगावात मंगळवारी घडले. विशेष म्हणजे पोलिस, शिक्षकांची नजर चुकवून टवाळखोरांनी कॉप्या पुरवल्या. 
 
नूतनमराठा, पोलिसलाइनजवळ जत्रा 
नूतनमराठा महाविद्यालयाचे मागचे गेट पोलिस लाइनला लागून आहे. सर्वात जास्त कॉपी पुरवण्याचे प्रकार येथेच झाले. पोलिस आले की लागलीच टवाळखोर पोलिस लाइनमध्ये पळून जात होते. वर्षानुवर्षे या भागात हा प्रकार घडतो आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेला या भागात दरवर्षीच कॉपी करण्यासाठी हीच पद्धत अवलंबली जाते आहे.
 
पोलिस लाइनचा सहारा घेऊन अनेक टवाळखोर या भागात थांबून असतात. याचप्रमाणे नूतन मराठा महाविद्यालयाचे पुढचे गेट, महाराणा प्रताप विद्यालय, अँग्लो उर्दू हायस्कूल येथे मोठ्या प्रमाणात कॉपी केली गेली. नूतन मराठा महाविद्यालयाच्या पुढील मागच्या गेटजवळ पोलिसांनी काही टवाळखोरांना लाठ्यांचा ‘प्रसाद’ दिला होता. मात्र, काही वेळाने परिस्थिती ‘जैसे थे’ झाली होती. ए.टी.झांबरे शाळेच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. या वेळी अनेक विद्यार्थ्यांच्या झडतीमध्ये कॉपी आढळून आल्या. त्या जप्त करण्यात आल्या होत्या. 
 
वडिलांच्या निधनाचे दु:ख विसरून दिली परीक्षा 
ला.ना.शाळेचा विद्यार्थी कन्हैया राजेश सूर्यवंशी या विद्यार्थ्याच्या वडिलांचे सोमवारी आजारपणामुळे निधन झाले. त्याने साेमवारी वडिलांना अग्निडाग दिला. तर मंगळवारी लागलीच त्याचा मराठीचा पेपर होता. वडील गेल्याचे दु:ख सावरून तो मंगळवारी पेपरला आला होता. त्याच्या मावशीने त्याला शाळेत आणून सोडले. अत्यंत दुःखद अवस्थेत त्याने पेपर सोडवला, अशी माहिती शिक्षकांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. 
 
पोलिसांवर दगडफेक 
गुळवेशाळेच्या कंपाउंडमध्ये बसून ड्यूटी करणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर टवाळखोरांनी दगडफेक केली. या पाेलिसांनी थेट दुचाकी काढून टवाळखोरांचा पाठलाग केला. शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या गल्लीतून दगड फेकले होते. पोलिसांनी येऊन एकाला पकडले. मात्र, ‘तो मी नव्हेच,’ असे सांगून पोलिसांच्या हाताला झटका देत पळून गेला. या गल्लीमध्ये सुमारे दोन तास टवाळखोरांनी धिंगाणा घातला होता. 
 
१३ जणांवर झाली कारवाई 
जिल्ह्यात६४ हजार ४७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पहिल्या दिवशी झालेल्या मराठीच्या पेपरला चिनावल (ता.रावेर) येथे तर वाघळी (ता.चाळीसगाव) येथे १२ अशा एकूण १३ जणांवर कॉपीची कारवाई करण्यात आली. जळगाव शहरात एकही कॉपीची कारवाई झाली नाही. कॉपीबहाद्दरांवर लक्ष ठेवण्यासाठी १५ भरारी विशेष पथक नेमण्यात आले होते. काही संवेदनशील केंद्रांवर व्हिडिओ चित्रण करण्यात आले.
 
बातम्या आणखी आहेत...