आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Time Pass Cinema's Dialogue Famous In Youth

तरुणाईमध्ये गाजताहेत ‘टाइमपास’चे डायलॉग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- हा माधव लेले (वैभव मांगले) यांचा दर्शकांना खळखळून हसवणारा ‘टाइमपास’मधील भन्नाट विनोदी संवाद सध्या युवकांच्या कट्टय़ांवर चांगलाच गाजतोय. फेसबुक आणि व्हॉट्स अँपवर या संवादाने पहिली पसंती मिळवली आहे. बिनधास्त दगडूचा ‘हम गरीब है तो क्या हुआ, दिल से अमीर है’ हा संवादही तरुणाईच्या ओठावर रेंगाळत आहे. पहिल्यांदाच मराठी चित्रपटातील हिंदी डायलॉग चांगलेच गाजत असल्याचे दिसून येत आहे. रवि जाधव दिग्दर्शित या मराठी चित्रपटाने कमाईचा विक्रम केला. शिवाय तरुणाईच्या मनात दगडू आणि प्राजक्ताच्या प्रेमकथेनेही घर केले आहे. त्यांना चित्रपटाच्या दुसर्‍या भागाची आता प्रतीक्षा आहे.

‘फिर नया है वह,
मै क्या बोल रहा हू,
तू क्या बोल रहा,
ये पेपर मारूंगा तेरे डोके में..’


‘हम जियेंगे अपनी र्मजी से और तुम पे मरेंगे भी अपनी र्मजी से, चल हवा आने दे’ असे कोवळ्या प्राजक्ताकडे बोट दाखवून म्हणणारा किशोरवयीन दगडू दर्शकांना भावला. त्याचे बहुतेक संवाद रसिकांनी डोक्यावर घेतले आहेत. हिंदी चित्रपटातील लक्षात राहण्याजोगे कितीतरी संवाद सांगता येतील, मात्र, ‘टाइमपास’ या मराठी चित्रपटामधील संवादांमध्ये नावीन्य आहे. ते युवा वर्गाच्या पसंतीस उतरले आहेत. चित्रपटात मराठी कुटुंबात बोलल्या जाणार्‍या मोडक्यातोडक्या हिंदी भाषेचा वापर केल्यामुळे आपसूकच विनोदाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे हे संवाद दीर्घकाळ लक्षात राहतील, अशा प्रतिक्रियादेखील व्यक्त होत आहेत.

दगडूने ‘आईबाबा आणि साईबाबाची शपथ’ हिट केली. ‘फिर नया है वह.’ यांसह ही शपथदेखील तरुणांचे फेसबुक आणि व्हॉट्स अँपवर झळकत आहे. आपण या संवादाचा भाग झालो पाहिजे म्हणणारे युवक भराभर त्याला लाइक देत आहेत. ‘आपल्याला आयुष्यात दोनच गोष्टी आवल्ल्या. एक म्हन्जे काजू कतली आणी दुसरी प्राजू पतली’ म्हणणार्‍या दगडूचे ‘हम गरीब.’ चा ‘आम्ही गरीब अलो म्हणून काय जाहले, आमच्या मनाची र्शीमंती अपरंपार. चला हवा येऊ द्या’ हे भाषांतर तर फर्मासच झाले आहे. त्यालाही पसंती मिळत आहे.

संवाद लक्षात राहण्याजोगे
चित्रपटाची प्रेमकथा उत्तम आहे. दगडूचा प्रत्येक संवाद लक्षात राहण्याजोगा आहे. त्यामुळे या संवादांची ठिकठिकाणी चर्चा होत आहे. ‘हम गरीब है तो क्या हुआ’ हा संवाद खूप आवडला. नीलेश पाटील