आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi To Play As A Professional Interest Should Not Dabholakar

मराठी नाटकाकडे व्यावसायिक नव्हे आवड म्हणून पहावे- दाभोळकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- तरुणाईचा ओढा चित्रपट, नाटक, मालिकांत काम करण्याकडे मोठय़ा प्रमाणात वाढतोय. ही चांगली बाब आहे. परंतु तरुणाईने मराठी नाटकाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता आवड म्हणून पाहावे, असा मोलाचा सल्ला अँडगुरू व ज्येष्ठ रंगकर्मी भरत दाभोळकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला. केसीई व्यवस्थापन महाविद्यालयातर्फे बुधवारी दाभोळकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी अँडगुरू दाभोळकर यांनी अनेक गोष्टींवर दिलखुलास चर्चा केली.
मराठी नाटके टिकवायलाच हवी. मराठी रंगभूमी जगविण्यासाठी त्याचे स्वरूप थोड्या प्रमाणात बदलायला हवे. ‘कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप’ मराठी नाटकांनी स्वीकारायला हवी. गुजराथी नाटक देखील त्याच प्रकारे जातेय. गुजराथी नाटकाचा पहिला शो झाला की त्याचवेळेच त्यांचे 500 ते 600 शो बुक होतात. म्हणजे एखादे सामाजिक मंडळ किंवा फेंड्र सर्कल त्या नाटकाचे प्रयोग बुक करून घेते. म्हणजे त्यांना तिकिटेदेखील विकायची गरज पडत नाही. त्यामुळे त्यांना पैसेही मिळतात आणि नाटकाचा प्रसारही होतो.
इंग्रजी नाटक खासकरून बँक प्रायोजित करते यामुळे त्यांनाही ती गरज भासत नाही. आपल्याकडे मात्र कॉर्पोरेट प्रायोजितची ही संस्कृती अजून अवलंबलेली नाहीये ती आता रुजणे आवश्यक आहे. नाटकाचे स्वरूप बदलायचे असल्यास इनोव्हेटिव्ह प्रयोग करणे आवश्यक आहे. त्यामुळे चोखंदळ प्रेक्षक तुम्हाला मिळतो. आजकाल नवीन काहीच दिसत नाही नाटकात ते दिसायला हवे.
दूरचित्रवाणीवरील मालिकांमध्ये कलाकार नोकरीसारखे काम करतात. त्यांना पैसे मिळताहेत. घराचा, गाडीचा हफ्ता भरला जातोय. टीव्हीकडे काहीच क्रिएटिव्ह नाहीये. स्वत:चे काही नवीन करणे, नवीन वेगळे देणे या दृष्टिकोनाने कोणीच पाहत नाही. त्यांच्यातील क्रिएटिव्हिटी संपली असल्याने प्रत्येक शॉट नोकरीप्रमाणे करताहेत.
हिंदी प्रमाणेच मराठी सिनेमासुद्धा ग्लॅमर झाला आहे. तेच तेच पाहायला मिळते आहे. सलमान खानचा चित्रपट 100 करोडचे बजेट करतो ते फक्त त्याच्यामुळे. मराठीतही काही मोजके कलाकारांवर चित्रपट असतात. चाहत्यांनीच त्यांची चाकोरी ठरवून घेतली आहे. त्या चाकोरीबाहेर विचार करायला हवे.
तरुणांनी कलाक्षेत्रात नक्की यावे मात्र फक्त हॉबी म्हणून याकडे पाहावे. इतर कोणतीही नोकरी करावी. आपल्या आर्थिक बाबीसाठी आणि आवड म्हणून या क्षेत्राकडे पाहावे. ज्याला मनापासून आवड आहे. तो नक्की याकडे येतोच पण अगोदरच करिअर म्हणून पहिले पाऊल ठेवायचे असल्यास नोकरी करून नाटक करावे.