आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1 तास 6 मिनिटे धावला सूर्यकांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मुसळधार पावसातही धावण्याचा आनंद घेत धावपटूंनी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचा आनंद लुटला. उस्मानाबादच्या सूर्यकांत फेरे याने एक तास सहा मिनिटे वेळ देत प्रथम क्रमांक मिळवला.

जळगाव जिल्हा अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशनतर्फे बबन बाहेती यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा झाल्या. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅँकेचे संचालक प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, सतीश देशमुख, क्रीडा रसिक स्पोर्ट्सचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, कबड्डी संघटनेचे सचिव नितीन बरडे, क्रीडा संस्थेच्या सचिव उज्‍जवला बाहेती, सेंट्रल बॅँकेचे व्यवस्थापक व्ही.व्यंकटेश, शशीमोहन बाहेती, रमेश बाहेती, प्रा.डॉ.नारायण खडके उपस्थित होते.

बक्षीस वितरणावेळी साईसेवा परिवाराचे जिल्हाध्यक्ष शरद शहा, बन्सी माळी, पांडुरंग खडके, प्रवीण पाटील, प्रा.पी.आर.चौधरी, प्रा.इक्बाल मिर्झा, उत्तम चिंचोळे, मनोज जाधव उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा अ‍ॅथेलेटिक्स असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

असा होता 21 किलोमीटरचा मार्ग
गणेश कॉलनीतील खॉजामिया दग्र्यापासून स्पर्धेस सुरूवात झाली. शिवाजी पुतळा, बसस्थानक, स्वातंत्र चौक, आकाशवाणीचौक, काव्यरत्नावली चौक, शिरसोली नाका, जैन व्हॅली, शामाफायर मार्गे पुन्हा बहिणाबाई उद्यान, रिंगरोड मार्गे खॉजामिया चौफुलीवर समारोप झाला. 21 किलोमीटरचे अंतर स्पर्धेकांनी पार पाडले.

चोक पोलिस बंदोबस्त
शहरासह ठाणे, पुणे, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बुलढाणा, उस्मानाबाद, नांदेड, नाशिक, नागपूरातून धावपटू सहभागी झाले होते. प्रथन विजेत्यास 21 हजार, द्वितीय 15 हजार, तृतीय 7 हजार व बाहेती चषकासह प्राविण्यपत्र देण्यात आले. स्पर्धेवेळी रस्त्याच्या एका बाजुने धावपटूंमागेपुढे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.