आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • March On Collector Office, Latest News In Divya Marathi

कत्तलखाना बंद करण्‍यासाठी टाळ-मृदंगाच्‍या मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एरंडोल येथील पांडववाडा हा प्राचीन परंपरेची साक्ष देणारा आहे, त्याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, शिरसोली येथील कत्तलखाना बंद करावा या व अन्य मागण्यांसाठी शनिवारी हिंदु जनजागृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी निकम यांना देण्यात आले.
मोर्चामुळे एकेरी वाहतूक
धर्मध्वज पूजनाचे पौरोहित्य भवानी मंदिराचे गादीपती त्रिपाठी यांनी केले. अजय ललवाणी यांनी धर्मध्वज पूजन केले. समितीचे प्रवक्ते सुनील घनवट, नंदकुमार जाधव, प्रतीक्षा कोरेगावकर, सुरेश भोळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सकाळी दहाला मोर्चाला सुरुवात झाली. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान, टॉवरचौक, जुने बसस्थानक, शिवतीर्थ मैदान, स्वातंत्र्यचौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे दीड हजारावर सदस्य सहभागी झाल्याने मोर्चाच्या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. वारकरी संप्रदायाच्या वतीने दिंडी, भजनांचे विविध पथकेही यात सहभागी होते. महापालिकेजवळ उपायुक्तांनी आंदोलकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
15 दिवसांत कत्तलखाना हटवा
जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या सभेत सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव यांनी हिंदूंची वास्तू परत मिळविण्यासाठी अखंड लढा देणे आवश्यक असल्याचे सांगितले. समितीचे राज्य समन्वयक सुनील घनवट शिरसोली कत्तलकारखाना 15 दिवसांत बंद न झाल्यास हिंदू रस्त्यावर उतरतील असा इशारा दिला. अजय ललवाणी यांनी गोमातेच्या रक्षणासाठी हिंदुंना आंदोलने करावी लागतात ही शोकांतिका असल्याचे सांगितले. हिंदू महासभेचे अधिवक्ता गोविंद तिवारी, नरेश खंडेलवाल, ज्ञानेश्वर महाराज, गजानन राजपूत, मोहन तिवारी, गायत्री शर्मा, माहेश्वरी महिला मंडळाच्या प्रविणा मुंदडा, श्यामसुंदर तिवारी, पद्माकर जैन, दीपक जोशी, अशोक लाडवंजारी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होते. मोर्चामुळे नेहरू चौक, टॉवर चौकातील वाहतूक काही वेळासाठी थांबविण्यात आली होती. टॉवर चौकात वाहतूक थांबविल्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केला.
सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा.
सुरक्षिततेसाठी मागील बाजूचा दरवाजा बंद ठेवावा
सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वाडा खुला ठेवावा
निर्णय घेण्यासाठी विशेष अधिकारी नियुक्त करावा
पांडववाड्यातील अवैध बांधकाम पाडावे