आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीअारएम कार्यालयावर काढला माेर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- भुसावळ विवेक देवराय कमिटीने सरकारला सादर केलेल्या अहवालाविरुद्ध सीआरएमएसतर्फे गुरुवारी सायंकाळी डीअारएम कार्यालयावर माेर्चा काढण्यात अाला. डीअारएम कार्यालयाच्या परिसरात माेर्चाचे रूपांतर द्वारसभेत झाले.
रेल्वेस्थानकाच्या केला सायडिंगकडील बाजूने गुरुवारी संध्याकाळी सीअारएमएस पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माेर्चा काढला. रेल्वेस्थानकापासून निघालेला माेर्चा डीअारएम कार्यालयात आल्यावर द्वारसभा घेण्यात आली. विवेक देवराय कमिटीच्या विराेधात घाेषणाबाजी करण्यात अाली.
देवराय कमिटीमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे माेठे नुकसान हाेणार अाहे, त्यामुळे या कमिटीचा निषेध नोंदवण्यात आला. सीआरएमएसचे मंडळ सचिव एस.बी. पाटील, कारखाना मंडळ सचिव पी.एन. नारखेडे, मंडळ संघटक अार.पी. भालेराव, काेषाध्यक्ष ताेरणसिंग, पीअाेएच शाखेचे उपाध्यक्ष मेघराज तल्लारे, एस.एस. चाैधरी यांनी विचार मांडले. नंदकिशाेर उपाध्याय, किशाेर काेलते, दीपक शर्मा, राकेश मेश्राम, नितीन भंगाळे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

सीअारएमएसच्या पदािधकाऱ्यांनी काढलेल्या माेर्चाला रेल्वेस्थानकापासून सुरुवात करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...