आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिसाळलेले माकड उठले माणसांच्या जीवावर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गायत्रीनगरात साेमवारी पिसाळलेल्या एका माकडाने दिवसभर धुमाकूळ घालत अाठ जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यातील दाेघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात अाले अाहे, तर सहा जणांवर उपचार करून साेडून देण्यात अाले अाहे. तीन दिवसांपासून गायत्रीनगरात लंगूर प्रजातीच्या माकडाने उच्छाद मांडला असून अातापर्यंत त्याने सुमारे २० जणांना चावा घेतला अाहे. या माकडाला पकडण्यासाठी वन विभागाकडे एकही अावश्यक असलेले साधन उपलब्ध नसल्याने अधिकारी कर्मचारी हतबल झाले अाहेत, तर दुसरीकडे माकडाच्या दहशतीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागत अाहे.
शहरात माकडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली असून, ते जळगावकरांच्या जीवावर उठले अाहे. तीन दिवसांत या माकडाने सुमारे २० नागरिकांवर हल्ला केला अाहे. माकड नागरिकांच्या घरात घसून चावा घेत आहे. परिसरात इतरही माकडे अाहेत. पण एकच पिसाळलेले माकड नागरिकांवर हल्ला करीत अाहे. १६ जानेवारी राेजी दुपारी वाजेपासून या माकडाने पाच ते सहा नागरिकांवर हल्ला चढवला हाेता. त्या वेळी नागरिकांनी काठी, दगडांचा धाक दाखवून हुसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही एक फरक पडला नाही. १७ राेजी माकडाने पुन्हा दिवसभर उच्छाद घातला. त्यामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडताना झाडे, छत, संरक्षण भिंत तपासूनच बाहेर पडावे. माकडाच्या हल्ल्यात साेमवारी बांधकाम मजूर वसंत गोपाळ (वय ५५, रा.वावडदा), समाधान लोखंडे (वय ५०, रा.रवंजा), नजीर खान अहमद (वय २३, रा.जळगाव), गणेश कोळी (वय ४०), गिरीश पाटील (वय ५१, रा.गायत्रीनगर), ब्लँकेट विक्रेता अमरसिंग बंजारा (वय ५५, रा.धान्य मार्केट), कमलेश पराळकर, अजिंक्य वडनेरे हे जखमी झाले अाहे. या सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात अाले हाेते. यातील गिरीश पाटील अमरसिंग बंजारा यांना सिव्हिलमध्ये दाखल केले अाहे, तर उर्वरित सहा जणांवर उपचार करून साेडून देण्यात अाले अाहे.

विभागाला माहिती नाही
^गायत्रीनगरातमाकडानेधुमाकूळ घातल्याची माहिती अजूनही माझ्यापर्यंत अालेली नाही. माहिती घेऊन याेग्य त्या उपाययाेजना करण्यात येतील. आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक

अँटी रेबिजचा मुबलक साठा
^माकडानेचावा घेतलेले अाठ रुग्ण सिव्हिलमध्ये सोमवारी दाखल झाले होते. त्यांना अँटी रेबिज ही लस देण्यात अाली. त्या औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. डॉ.किरण पाटील, प्रभारीजिल्हाशल्यचिकित्सक