आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समितीतील संकुलाचा शेतकऱ्यांशी संबंध नाही; आडत्यांना मात्र जागेची समस्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव :  जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रस्तावित व्यापारी संकुलाचा शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष संबंध नाही. या संकुलामुळे बाजार समितीच्या अावारातील काही आडत्यांना जागेची समस्या येऊ शकते. या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल असल्याने न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणेच निर्णय घ्यावा, असा अभिप्राय जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिला अाहे. कृउबामध्ये प्रस्तावित व्यापारी संकुल उभारण्यावरून वाद निर्माण झाल्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना चाैकशी करून अहवाल सादर करण्याचे अादेश दिले हाेते. त्यानुसार उपनिबंधकांनी अभिप्रायासह १६ पानी अहवाल शासनाला सादर केला अाहे. 
 
पहूर-इंदूर महामार्गावर जळगाव शहरात असलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजिंठा रत्यालगत बीअाेटी तत्त्वावर व्यापारी संकुल बांधण्यास शेतकरी अाणि अडत असाेसिएशनने विराेध केला अाहे. यासंदर्भात मार्केट यार्ड अडत असाेसिएशनने न्यायालयात धाव घेतली अाहे. व्यापारी संकुलावरून निर्माण झालेल्या वादावर ताेडगा काढण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधकांना २१ एप्रिल राेजी झालेल्या बैठकीत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे अादेश दिले हाेते. जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी २१ एप्रिल, २ मे राेजी बाजार समितीला भेट दिली. २४ एप्रिल राेजी कृषी उत्पन्न बाजार समिती अाणि जिल्हा मार्केट यार्ड असाेसिएशनकडून खुलासा मागवला हाेता. बाजार समिती अाणि अडत असोसिएशनने सादर केलेल्या लेखी खुलाशानुसार जिल्हा उपनिबंधकांनी या प्रकरणी स्वयंस्पष्ट अभिप्राय देत २७ मे राेजी शासनाला अहवाल सादर केला अाहे. स्पर्धेत बाजार समितीने टिकून राहण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा पुरेपूर वापर केला पाहिजे. व्यापारी गाळ्यांचे नियमानुसार बांधकाम करावे, अार्थिक स्त्राेत निर्माण करावेत, असे करीत असताना अाडते, व्यापारी, शेतकरी, हमाल यांच्यावर अन्याय हाेऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या अाहेत. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी शेतकरी निवास, उपाहारगृहे उभारण्याच्या सूचना केल्या अाहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या निर्णयानुसारच निर्णय घ्यावा, असा सावध पवित्रा घेतला अाहे. 
 
बाजार समिती, अाडत संघटनेकडून खुलासे : कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारी संकुलासंदर्भात सर्व तांत्रिक माहिती सादर करीत उपनिबंधकाकडे लेखी खुलासा केला अाहे. बाजार समितीने १८४ गाळ्यांचे बीअाेटीवर बांधकाम करण्यासाठी ७ फेब्रुवारी २०१४ राेजी निविदा काढली हाेती. त्या निविदेनुसार पराग कन्स्ट्रक्शनला ठेका देण्यात अाला असून त्यापाेटी बाजार समितीला ५ काेटी ७२ लाख १३ हजार ६६४ रुपयांचे उत्पन्न मिळाले अाहे. यासंदर्भातील परवानग्या, न्यायालयीन लढाईसंदर्भातील १८ मुद्दे बाजार समितीने सादर केले अाहेत. 
 
शेतकऱ्यांची कोणतीही गैरसाेय नाही 
बाजार समितीच्या प्रस्तावित व्यापारी संकुलाच्या बांधकामाबाबत शेतकरी अाणि अाडत असोसिएशनने तक्रार केली अाहे. मात्र, व्यापारी संकुलाच्या बांधकामाचा शेतकऱ्यांशी कोणताही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध दिसून येत नाही. त्यामुळे या गाळे बांधकामामुळे शेतकऱ्यांची कोणतीही गैरसाेय हाेणार नाही. मात्र, पश्चिमेस असलेल्या गाळेधारकांना थोडी अडचण निर्माण हाेईल, असा अभिप्राय जिल्हा उपनिबंधकांनी दिला. 
 
बातम्या आणखी आहेत...