आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न कर म्हणत तरुणीला मारहाण, तिचे ठरलेले लग्नही तरुणाने माेडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ‘माझ्याशी प्रेम कर... तुला माझ्याशीच लग्न करावे लागेल...’ अशा धमक्या देत एका तरुणाने गुरुवारी सायंकाळी वाजता नवीन बसस्थानकाबाहेर तरुणीला मारहाण केली. याप्रकरणी शहर वाहतूक पाेलिसांनी तरुणाला पकडून जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले.

जामनेर येथील दीप्ती (नाव बदलले अाहे) मू.जे.महाविद्यालयात एमएस्सीचे शिक्षण घेत अाहे. त्यामुळे ती दरराेज एसटीने जामनेर येथून ये-जा करते. सहा महिन्यांपूर्वी बसमध्ये तिची नेरी येथील कापड दुकानदार अमाेल गाेकुळ पाटील (वय २४, रा.माेहाडी, ता.जामनेर) याच्याशी अाेळख झाली. त्यानंतर त्याने दीप्तीला प्रेमाची मागणी केली. मात्र, तिने त्यास नकार दिला. त्यामुळे अमाेलने दीप्तीला त्रास देणे सुरू केले.
तीन महिन्यांपूर्वी त्याने दीप्तीला मारहाण केल्याने तिचा पाय फ्रॅक्चर झाला हाेता. मात्र, घाबरून तिने घरी माेटारसायकलने धडक दिल्याने लागल्याचे सांगितले. तसेच दीड महिन्यांपूर्वी त्याने तिला पुन्हा मारहाण केली. त्यामुळे तिचा चेहरा सुजला हाेता; परंतु पडल्याने सुजल्याचे तिने घरी सांगितले. तीन महिन्यांपूर्वी तिचे लग्न ठरले हाेते साखरपुडाही झाला हाेता. मात्र, अमाेलने ते लग्नही माेडले. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता दीप्ती महाविद्यालयातून बाहेर निघाली. त्या वेळी बाहेर उभ्या असलेल्या अमाेलने दीप्तीला अडवले. त्याने लग्न कर म्हणून पुन्हा जबरदस्ती केली. मात्र, तिने नकार दिल्याने त्याने नवीन बसस्थानक परिसरात तिला मारहाण केली.

रॅटकिल खाऊन दिली धमकी
दिप्तीगुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता तिच्या मैत्रिणीसह बसस्थानकाकडे रिक्षाने निघून गेली. त्या वेळी बसस्थानकाबाहेर अमाेलने पुन्हा त्यांना गाठले. या वेळी त्याने हातात उंदीर मारण्याचे विषारी अाैषध रॅटकिल घेऊन तिला ‘माझ्याशी लग्न कर; नाही तर मी रॅटकिल खाऊन घेईल’ अशी धमकी दिली. मात्र, तरीही दीप्तीने नकार दिल्याने अमाेलने रॅटकिल खाल्ले. त्यानंतर त्याने पुन्हा मारहाण करणे सुरू केले. याप्रकरणी शहर वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमाेलला ताब्यात घेऊन जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले.