आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे: मूलबाळ होत नाही, पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे: मूलबाळ होत नसल्यामुळे तसेच चारचाकी वाहनासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यात आला, अशी तक्रार शहरात माहेर असलेल्या योगिता गणेश पवार (वय ३०) या विवाहितेने दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून गणेश बाबूराव पवार, बाबूराव देवराम पवार, स्नेहकला बाबूराव पवार, गायत्री संजय अहिरे, संजय मुरलीधर अहिरे, शुभांगी अनिल सोनवणे, अनिल रामदास सोनवणे, ज्योती राजेंद्र सोनवणे (सर्व रा. करवंद, ता. शिरपूर) यांच्या विरोधात देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे. 
 
चारित्र्याच्या संशयावरून छळ 
धुळे तालुक्यातील लोहगड येथील विवाहितेचा चारित्र्याच्या संशयावरून छळ करण्यात आला, अशी तक्रार सरिता रोहिदास नेरकर (वय २१) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. यातून शारीरिक मानसिक छळ करण्यात आला, असेही पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विवाहितेच्या तक्रारीवरून रोहिदास नारायण नेरकर, रत्ना नारायण नेरकर, नारायण नेरकर, अश्विनी महेंद्र नेरकर, हिंमत जगन्नाथ जाधव यांच्या विरोधात धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...