आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage Offer Reject Issue Discredit On Facebook At Jalgaon

लग्नास तरुणीचा नकार; फेसबुकवरून बदनामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- लग्नास नकार दिला म्हणून फेसबुकवर बनावट अकाउंट तयार करून तरुणीची बदनामी केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक कुकरेजा (वास्तुशिल्पी, सौभाग्यनगरसमोर, देवळाली, नाशिक) याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला असून, तो जून 2011पासून संबंधित तरुणीच्या मागावर राहून तिला लग्नाची मागणी घालत होता; मात्र त्या तरुणीने लग्नास नकार दिला होता. त्यामुळे तिच्या बदनामीच्या उद्देशाने आपल्या नावाआधी तिचे नाव टाकून प्रतीकने फेसबुकवर बनावट अकाउंट उघडले.
तसेच संबंधित तरुणीच्या व तिच्या नातेवाइकांच्या मोबाइलवर फोन आणि एसएमएस करून ‘तुम्ही तिचे माझ्याशी लग्न लावून दिले नाही, तर फेसबुकवर बदनामी करेन व मुलीला पळवून नेईन’ अशी धमकीही दिली. त्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीच्या नातलगांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात प्रतीक कुकरेजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.