आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न सोहळ्यांना 27 एप्रिलपासून सुरुवात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दाते पंचांगानुसार विवाहाचे शुभमुहूर्त 27 एप्रिलपासून पुन्हा सुरू होत आहेत. सर्वाधिक 16 मुहूर्त मे महिन्यात आहेत. जूनमध्ये फक्त 2 आणि जुलै महिन्यात 3 मुहूर्तांवर लग्न लागतील. 21 एप्रिल रोजी शुक्राचा उदय होत असल्याने विवाहाचे मंगल सूर ऐकायला मिळतील. त्यानंतर 15 जुलैपर्यंत बरेच विवाह मुहूर्त आहेत. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत विवाह सोहळ्यांना ब्रेक लागणार आहेत. त्यानंतर पुन्हा 18 नोव्हेंबरनंतर पुन्हा विवाहाचे मुहूर्त सुरू होतील.

25 एप्रिल रोजी खंडग्रास चंद्रग्रहणामुळे विवाह मुहूर्त नाहीत. मात्र, त्याच्या दुसर्‍या दिवसापासून विवाह होतील. ग्रहणानंतर 26 एप्रिल रोजी विवाहस्थळांना पवित्र नद्यांच्या पाण्याने शुद्ध करण्याचा चांगला योग आहे.


अक्षयतृतीयेचा मुहूर्त
सर्वांत जास्त विवाह 13 मे रोजी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होतील. या दिवशी चांगला मुहूर्त आहे. या दिवशी परिणय मंगलगाठीत बांधले जाणे अत्यंत शुभ मानले जाते. जिल्ह्यातही सामूहिक लग्नसोहळ्यांचे आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. त्यानंतर जुलै महिन्यातही मोठय़ा प्रमाणात विवाह सोहळे होऊ शकतात. दुष्काळाची स्थिती असली तरी विवाहाच्या तयारीनिमित्ताने बाजारात गर्दी होऊ लागली आहे.


गुढी उठताच मंगलकार्य
22 फेब्रुवारीपासून शुक्राचा अस्त झाला होता. त्यामुळे लग्नसोहळ्यांना ब्रेक लागला होता; परंतु आता 21 एप्रिल रोजी शुक्राचा उदय होत असून गुढी उठते आहे. त्या दृष्टीने अनेकांनी नियोजन सुरू केले आहे. 19 जुलै रोजी आषाढी एकादशी असून चातुर्मासाला सुरुवात होत आहे. तेव्हापासून चार महिने विवाह होणार नाहीत. कार्तिक महिन्यात 18 नोव्हेंबरपासून विवाह सुरू होतील, असे पुरोहित प्रसाद धर्माधिकारी यांनी सांगितले.


विवाहाच्या तिथी
एप्रिल : 27 व 29, मे : 2, 3, 6, 11, 12, 13, 18, 20, 21, 22, 23, 25, 27, 28, 29, 30, जून : 2 व 3, जुलै : 11, 14, 15, नोव्हेंबर : 18, 19, 20, 25, 27, 28, 29, 30, डिसेंबर : 4, 6, 7, 8, 10, 12, 13, 17, 24, 26, 28, जानेवारी :2014 : 18, 19, 21, 22, 23, 24, 26, 28.