एरंडोल- पती दररोज दारू पिऊन मारहाण करतो. सासू सासरे व दीर मारहाण करून शिविगाळ करतात, या दररोजच्या जाचाला कंटाळून एका विवाहीतेने आपल्या दोन चिमुरड्यांना सोबत घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेली माहिती अशी की, शीतल नरेंद्र महाजन (27) असे विवाहीतेचे नाव आहे. तिने मुलगा तेजस नरेंद्र महाजन (7) व मुलगी साधना नरेंद्र महाजन (14 महिने) या दोघांना शेतात नेले. शेतातील विहिरीत आधी दोन्ही मुलांना ढकलले नंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली.
काल (बुधवारी) मध्यरात्री पासून शीतल महाजन दोन्ही मुलांसह बेपत्ता होती. तिच्या सासर आणि माहेरचे लोक तिचा शोध घेत होते. शीतलने मुलांसह आत्महत्या केली की, तिला विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आली. हे अद्याप समजू शकले नाही. शीतलच्या माहेरच्या लोकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...