आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या दुचाकीवरून फेरी मारत असताना विवाहितेचा अपघाती मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- नवीन घेतलेली दुचाकी शिकत असताना अपघात झाल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गुरुदत्त कॉलनीत घडली.

सुजदे-भोलाणे येथील माहेर असलेल्या गायत्री मनोज सोनवणे (वय २०) हिचे १० महिन्यांपूर्वीच मनोज सोनवणे यांच्याशी लग्न झाले होते. मनोजने कुटंुबातील सदस्यांसाठी नुकतीच अॅक्टिवा ही दुचाकी (एमएच १९ बीएक्स २७५९) खरेदी केली होती. गुरुवारी रात्री जेवण आटोपल्यानंतर गायत्री यांनी दुचाकी शिकण्याच्या उद्देशाने बाहेर काढली. घरापासून काही अंतर दूर गेल्यानंतर रस्त्यात आलेला खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला. त्यामुळे दुचाकी थेट एका भिंतीवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी गायत्री यांना जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या वेळी डॉ. अजय सोनवणे यांनी गायत्री यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास उमाकांत चौधरी करीत आहेत.