आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारचाेर टाेळीचा म्हाेरक्या अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यभरातूनकार चाेरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा म्हाेरक्या बाबू अमरसिंग ऊर्फ जसवंतसिंग अमरसिंग राजपूत याला रविवारी रात्री १० वाजता ठाण्यातून एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्याला साेमवारी सात दिवसांची पाेलिस काेठडी सुनावली.

अमळनेर येथे लक्झरीयस कार कमी किमतीत मिळवून देणारी व्यक्ती असल्याची माहिती एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी मिळाली हाेती. त्यानुसार बापुराव भाेसले, उत्तमसिंग पाटील यांच्या पथकाने किशाेर पाटील, भूषण पाटील (दाेघे रा. मेहेरगाव) यांना २८ जुलै २०१४ राेजी, तर राजदत्त परब (वय २६), प्रमाेद गवळे (दाेघे रा. वागळे इस्टेट, ठाणे) यांना अाॅगस्ट २०१४ राेजी अटक केली हाेती. मात्र, टाेळीचा म्हाेरक्या बाबू अमरसिंग (वय ३४, रा. वागळे इस्टेट, ठाणे) पाेलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्या मागावर वर्षभर एलसीबीचे सुरेश पवार, राजेंद्र पाटील, शशी पाटील, महेंद्र पाटील, विलास पाटील अाणि शरद सुरळकर हे पथक काम करीत हाेतेे. अखेर त्याला रविवारी त्याला ताब्यात घेतले.

पाेलिसांवर केला हाेता हल्ला
कुमुदज्ञानदेव नेहेते (वय ५२, रा. यशवंतनगर) यांनी दिलेल्या िफर्यादीवरून तालुका ठाण्यात गुन्हा दाखल केला हाेता. पाेलिसांना या प्रकरणातील चाैघे सापडले. मात्र, टाेळीचा म्हाेरक्या बाबू पाेलिसांना सापडत नव्हता. ३१ जुलैला बाबूला एका बातमीदाराच्या माध्यमातून पाेलिसांनी धुळे येथे बाेलावले हाेते. रायते यांच्यासह पथकाने सापळा लावला हाेता. बाबू त्या ठिकाणी अाला. मात्र, पाेलिसांनी सापळा लावल्याचे त्याला समजल्यावर त्याने वेगाने गाडी पथकाच्या अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न केला हाेता. तेव्हापासून बाबू फरारच हाेता.
बातम्या आणखी आहेत...