आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mathematics Question Solve By Mobile Application

अॅप्लिकेशनने सोडवा गणिताचे प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शालेय जीवनात गणित विषयाशी ब-या च विद्यार्थ्यांचे जमत नाही. तसेच स्पर्धा परीक्षांमध्येही हा विषय मोठी डोकेदुखी ठरतो. मात्र, आता बाजारात अनेक मोबाइल अप्लिकेशन उपलब्ध झाल्याने गणित सोडवणे अत्यंत सोपे झाले आहे. किचकट प्रश्न सोडवण्याच्या साेप्या पद्धती या अॅप्समध्ये दिलेल्या आहेत. कोणत्याही अंॅड्रॉइड फोनमध्ये सहज डाऊनलोड करता येणारे हे अॅप्स विद्यार्थ्यांना अधिक फायदेशीर ठरणारे आहेत.

या अॅप्लिकेशनमध्ये अनेक नवनवीन खेळ दिले असून, त्यातून गणिताचा अभ्यासही होत आहे. विशेष म्हणजे, गणित विषयाबद्दलचा ताण दूर होऊन विषयाची गोडी वाढवण्याचे कामदेखील हे अॅप्स करत आहेत. कागद-पेन्सिलने गणिते सोडवण्यापेक्षा मोबाइल अॅप्सची मदत घेऊन, खेळातून गणित सोडवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढवण्यासाठी हे अॅप्स विकसित करण्यात येत आहेत.

मॅथ मॅजिक ट्रिक्स
याअॅपच्या मदतीने कठीण प्रश्नांना सोप्या पद्धतीने सोडवले जाते. गणिताच्या जटिल प्रश्नांना सोडवण्याच्या आधुनिक पद्धती या अॅपमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे हे अॅप जास्त लोकप्रिय असल्याचे मानले जाते.

मॅथ ट्रिक्स
याअॅपमध्ये गणिताचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा फंडा शिकवला जातो. गणित या विषयाला वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागले जाते. या अॅपमध्ये दिलेले गेम्स दोन जण अगदी सोप्या पद्धतीने खेळू शकतात. तसेच खेळा-खेळातच प्रश्नांनी उत्तरेही दिली जातात. खेळ संपला की, उत्तरे समोर येतात. यात दोघांच्या उत्तरांची तुलना पद्धतही सांगितली जाते.

मॅथएक्स्पर्ट
यातगणित विषयासह विज्ञानासंदर्भातील विभागही दिला आहे. तसेच भूमितीच्या प्रश्नांची उकलही या अॅपमध्ये करता येऊ शकते. त्यामुळे या अॅपला वेगळेच महत्त्व आहे.

हे आहेत अॅप्स
शॉर्टट्रिक्स ऑफ मॅथ, किंग ऑफ मॅथ, मॅथ फॉर्म्युला, ब्रेन ट्रेनिंग मॅथ वर्कआऊट, मॅथ ब्रेन ट्रेनिंग, मॅथ एक्स्पर्ट, मॅथ मॅजिक ट्रिक्स मॅथ ट्रिक्स.