आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor, Former Speaker Of The Standing House Take Metting In Jalgaon

महापौर, स्थायीच्या माजी सभापतींनी घेतली सभा, व्यापक प्रसिद्धी नसल्याने नागरिकांची अनुपस्थिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार क्षेत्रसभा घेणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई शक्य असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधले होते. त्याचा परिणाम म्हणून महापौर राखी सोनवणे स्थायी समितीचे माजी सभापती नितीन लढ्ढा यांनी सोमवारी आपल्या वॉर्डासाठी क्षेत्रसभा घेतली. मात्र, क्षेत्रसभेबाबत व्यापक प्रसिद्धी झाल्याने नागरिक या सभेकडे फिरकलेच नाहीत. अर्धा तास प्रतीक्षा करून अखेर कागदावर स्वाक्षरी मोहीम राबवून सभा आटोपती घेण्यात आली.

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ‘अ’ ‘ब’मधील नागरिकांसाठी महापौर राखी सोनवणे नितीन लढ्ढा यांनी सोमवारी सकाळी वाजता क्षेत्रसभेचे आयोजन केले होते. या क्षेत्रसभेसाठी सचिव म्हणून प्रभाग अधिकारी अ.वा.जाधव यांनी काम पाहिले. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राखी सोनवणे होत्या. या वेळी नगरसेवक श्याम सोनवणे, सहायक आरोग्य अधीक्षक एस.बी.बडगुजर, लाइट विभागाचे कनिष्ठ अभियंता विलास पाटील, पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता भागवत पाटील, आरोग्य निरीक्षक आर.व्ही.पाटील, प्रभागाचे वरिष्ठ लिपिक नरेंद्र चौधरी वसुली लिपिक कैलास सोनार उपस्थित होते. या सभेची वेळ वाजेची ठरली असली तरी, याबाबत व्यापक प्रसिद्धी झाल्याने नागरिकांना कल्पनाच नव्हती. सुमारे अर्धा-पाऊण तास वाट पाहूनही नागरिक आल्याने उपस्थितांनी स्वाक्षऱ्या करून सभा आटोपली. दरम्यान, सभा झाल्याचे दाखवण्यासाठी नंतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.
नागरिकां विना क्षेत्रसभा अर्थहीन
महापालिकेचे सभागृह सार्वभौम असून, त्यात लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना शहराच्या हिताचे धोरण ठरवण्याचे अधिकार आहेत. मात्र, या सभागृहात सामान्य नागरिकांना थेट प्रवेश मिळून सभागृहातील कामकाजात आपल्या सूचना मांडता येत नाही. हीच कायदेशीर अडचण स्थायी समिती सभेत असते. त्यामुळे नागरिकांना आपल्या भागातील कामांसंदर्भात प्राधान्यक्रम मांडता यावा त्याबाबत अधिकाऱ्यांच्या तोंडून थेट वस्तुस्थिती कळावी, या उद्देशाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात क्षेत्रसभेची तरतूद कर‌ण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्दीत ग्रामसभेच्या रचनेप्रमाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी क्षेत्रसभा तेवढीच महत्त्वाची आहे. क्षेत्रसभेत नागरिकांना थेट सहभागी होऊन भागातील कामांची प्राथमिकता अडचणी मांडून त्यावर उत्तर प्राप्त करता येते. मात्र, नागरिकांच्या सहभागाशिवाय क्षेत्रसभा अर्थहीन आहे.
कायदा म्हणतो...
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९-क (१)नुसार सभेचा कार्याध्यक्ष सभा बोलावेल. तसेच क्षेत्रसभेची दिनांक, वेळ ठिकाण जाहीर करणारी नोटीस काढेल. अशा प्रत्येक क्षेत्रसभेबाबत संबंधित क्षेत्रात विस्तृत प्रसिद्धी होईल.