आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर हेल्पलाइन सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील सामान्य नागरिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरलेल्या महापौर हेल्पलाइनचे उद्घाटन मंगळवारी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी झाला.

पहिल्याच दिवशी 38 नागरिकांनी संपर्क केला. त्यात चार फोन हे तक्रारीचे होते. दोन जणांनी पाणीपुरवठा होतो परंतु वेळेवर होत नाही. तसेच कमी दाबाने पुरवठा होत असल्याची तर अन्य दोन तक्रारी रस्ता व गटारींसंदर्भातील होत्या. अन्य फोन हे हेल्पलाइन सुरू झाल्याबद्दल अभिनंदनाचे होते. 1 एप्रिलपासून महापौर हेल्पलाइन सुरू करण्याची घोषणा किशोर पाटील यांनी केली होती. परंतु तांत्रिक अडचणीमुळे ते शक्य झाले नव्हते. सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत ही हेल्पलाइन कार्यान्वित राहणार आहे. नागरिकांना काही समस्या असल्यास त्यांनी 8408004567 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे महापौर किशोर पाटील यांनी सांगितले.