आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे महापाैर नितीन लढ्ढा राजीनामा देणार; ललित कोल्हे यांच्या नावाची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- खान्देश विकास आघाडीला सत्ता स्थापण्यात मदत करणाऱ्या महाराष्ट्र निर्माण सेनेला शेवटच्या १० ते १२ महिन्यांसाठी महापौरपद देण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. विद्यमान महापौर नितीन लढ्ढा हे मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता असून उपमहापौर असलेले ललित कोल्हे यांना महापौरपद दिले जाणार असल्याचे वृत्त आहे. 

मनसेचे जिल्हाध्यक्ष कोल्हे यांनी खाविआला मदत करीत सत्ता स्थापली आहे. या पंचवार्षिकमध्ये सुरुवातीला राखी सोनवणे यांना अडीच वर्षे महापौरपद देण्यात आले. त्यांच्यानंतर नितीन लढ्ढांनी कारभार सांभाळला. खाविअाची सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘हाय कमांड’ असलेले माजी आमदार सुरेश जैन यांनी मनसेला शेवटच्या १० ते १२ महिन्यात महापौर देण्यात येईल, असा शब्द दिला होता. आता शब्द पाळण्याची वेळ आल्यामुळे गेल्या आठवड्यात ‘७ शिवाजीनगर’ येथे झालेल्या औपचारिक बैठकीत लढ्ढा यांना राजीनामादेण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. लढ्ढा यांच्यानंतर उपमहापौर ललित कोल्हे यांना महापौरपदाची संधी मिळणार आहे. तर उपमहापौरपदी खान्देश विकास आघाडीच्या महिला नगरसेविका ज्योती इंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बैठकीला माजी आमदार जैन हे उपस्थित नसले तरीदेखील त्यांच्या संमतीनेच ही बैठक झाल्याचे वृत्त अाहे. 

विजयकोल्हे यांचीही चर्चा
उपमहापौरललित कोल्हे यांचे वडील विजय कोल्हे यांना महापौर करावे, अशी इच्छा खुद्द खाविआच्या नेतेमंडळींनी व्यक्त केली आहे. ललित कोल्हे हे विधानसभेचे देखील उमेदवार असतात. त्यांची महापौरपदाची मुदत संपल्यानंतर लागलीच विधानसभेची निवडणूकदेखील होणार आहे. अशात शहराच्या राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  

आदेश आल्यास राजीनामा 
खाविआमध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय सुरेश जैन घेतात. ते सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे या विषयावर माझ्याशी चर्चा झालेली नाही. आदेश आल्यास लगेच राजीनामा देईल. 
-नितीन लढ्ढा, महापौर 
बातम्या आणखी आहेत...