आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांचे पर्यावरणप्रेम फोटोसेशनपुरते; पर्यावरण प्रश्‍न मात्र दु‍र्लर्क्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीसह विविध उपक्रम राबवणार्‍या महापौर किशोर पाटील यांनी या कार्यक्रमातही चमकोगिरी केली. महापालिका आवारातून मोठा गाजावाजा करून काढण्यात आलेल्या पर्यावरण रथावरील फोटोसेशन पार पडल्यावर कोर्ट चौकात येताच गाडीवरील होर्डिंग्ज उतरवून घेण्यात आले.

पाणी परिषदेनंतर पर्यावरण संवर्धनासाठी जागतिक पर्यावरणदिनाला महापालिकेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास महापालिकेच्या आवारातून पर्यावरण रथ काढण्यात आला. पर्यावरण रक्षण करा, ध्वनिप्रदूषण टाळा, वृक्षतोडीविरुद्ध आवाज उठवा, अशा प्रकारचे संदेश असलेले होर्डिंग्ज दोन बैलगाड्यांवर ठेवून ‘पर्यावरण रथ’ तयार करण्यात आला होता. महापालिकेच्या आवारातून हा रथ निघताना महापौर किशोर पाटील, उपमहापौर मिलिंद सपकाळे, आयुक्त संजय कापडणीस यांनी फोटोसेशन केले. महापालिकेपासून निघालेला पर्यावरण रथ शिवतीर्थ मैदानाच्या जवळ येताच यातील होर्डिंग उतरवून घेण्यात आले. शहरातील मध्यवर्ती भागात फिरून फलकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असा या रथयात्रेचा उद्देश होता. मात्र, प्रमुख उद्देश बाजूला सारून चमकोगिरीनंतर रथयात्रा गुंडाळण्यात आली.