आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्तांकडून अग्निशमन विभागास व्हिजीट, महापालिका हजेरी पुस्तकात तंबाखू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आठवडा भरापासून गाजत असलेल्या अग्निशमन विभागाची चौकशी करणाऱ्या उपायुक्तांनी मंगळवारी सर्वच उपकेंद्रांची सरप्राइज व्हिजीट देऊन पाहणी केली. यात कर्मचाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. एका ठिकाणी तर चक्क तंबाखू आढळून आली. रजेच्या कोणत्याही नोंदी नसल्याने सर्वच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. चारही उपकेंद्रांतील सर्वच कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. यात दोषींवर थेट वेतनवाढ रोखण्याचीही कारवाई होऊ शकते.

गेल्या आठवड्यात अज्ञात व्यक्तीने ‘दिव्य मराठी’ कार्यालयात अग्निशमन विभागाचे हजेरी बुक पोहोचवले होते. यातून या विभागात किती गलथान कारभार सुरू आहे हेच उघड करणे त्या व्यक्तीचा उद्देश असावा. त्याच दिशेने आता प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. हजेरी बुक गहाळप्रकरणी चौकशी अधिकारी उपायुक्त अविनाश गांगोडे यांनी मंगळवारी सकाळी ११ ते या वेळेत अग्निशमन विभागाचे गोलाणी मार्केट, शिवाजीनगर, महाबळ एमआयडीसीतील उपकेंद्रांना अचानक भेट दिली. तीन तासांत उपायुक्तांनी हजेरी बुक तपासले. यात एमआयडीसीतील कर्मचारी ११ दिवसांपासून कुठे स्वाक्षरी करताय याची माहिती त्यांनाही मिळू शकली नाही. कार्यालयात एकच कर्मचारी हजर होता. तर अन्य उपकेंद्रांतही वेगळी परिस्थिती नव्हती.

कायआढळले तपासणीत?
अग्निशमनच्याकर्मचाऱ्यांना हजेरी बुकाचे कोणतेही गांभीर्य नसल्याचे तपासणीदरम्यान उघड झाले. पेनातील शाई तपासण्यासाठी सुद्धा हजेरी पानावरच खाडाखोड करणे, रजेचा कोणताही तपशिल ठेवणे, गैरहजेरीचा शेरा मारलेला असतानाही त्यावर स्वाक्षरी करणे, असे प्रकार निदर्शनास आले. गैरहजर कर्मचाऱ्यांचे हालचाल रजिस्टरदेखील नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.

सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी होणार
एमआयडीसीउपकेंद्रातील सर्वच कर्मचाऱ्यांना बुधवारी प्राथमिक चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. गरज भासल्यास प्रत्येक कर्मचाऱ्याची उपायुक्त गांगोडे हे स्वतंत्र चौकशी करतील. जानेवारी २०१४ पासून हजेरीची तपासणी केली जाणार आहे. यात गैरहजर असतानाही पगार काढले गेले असतील तर कारवाई होईल.

एक वेतनवाढ रोखण्याची शक्यता
हजेरीबुकाच्या तपासणीदरम्यान उपायुक्त गांगोडे यांना त्यात तंबाखू सांडलेली पाहायला मिळाली. ज्या पुस्तकातील नो दीवरून पगार मिळतो, त्याबद्दल प्रचंड अनास्था असल्याचे उघड झाले. चौकशीनंतर अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची एक वेतनवाढ तर विभागप्रमुखांची दोन वेतनवाढ रोखण्याची कारवाई होऊ शकते.

अग्निशमन विभागाचे ऑडिट करा
पालिकेच्याअग्निशमन विभागातील हजेरी बुक गहाळ करण्यामागे नक्कीच काही तरी हेतू आहे. या विभागात सुरू असलेला भोंगळ कारभार उघड होण्यासाठीच दैनिकाच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणले गेले. त्यामुळे या विभागातील गैरप्रकारांचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यासाठी या विभागाचे विशेष लेखापरीक्षण करावे, अशी मागणी शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेने मंगळवारी उपायुक्तांना िनवेदनाद्वारे केली. अग्निशमन विभागातील कारभाराविषयी शहीद भगतसिंग संघटनेने यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्या असून मोठ्या प्रमाणात झालेले भ्रष्टाचार, गैरप्रकार, गैरव्यवहार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत.