आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमबीबीएस’ आता नऊ वर्षांत पूर्ण करा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘एमसीआय’ने (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) एमबीबीएस कोर्स उत्तीर्ण करण्यासाठी नऊ वर्षांचा कालावधी अनिवार्य करण्यात आला आहे. यापेक्षा जास्त वेळ घेणा-या विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये पदवीधर मानण्यात येणार नाही. काही महिन्यापूर्वीच एमसीआयने हा अध्यादेश जारी केला आहे.
योग्य कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण केल्यास उत्तम प्रकारचे शिक्षण घेऊन उत्तम डॉक्टरांची निर्मिती होऊ शकते, त्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करण्याची सवय लागण्यास मदत होईल. तसेच प्रोफेशनचे स्टॅँडर्ड मेंटेन केले जाईल. ब-याच वर्षांपासून एमबीबीएस कोर्स पूर्ण करण्यासाठी वेळेची मर्यादा नव्हती. पहिले वर्ष सोडले तर इतर संपूर्ण वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी कितीही वेळ घेत होते. फक्त प्रथम वर्ष चार अटेम्प्ट किंवा मर्सी अटेम्प्ट पास करणे अनिवार्य होते.
पहिले वर्ष क्लियर झाल्यानंतरच विद्यार्थ्यांना दुस-या तर शेवटच्या वर्षापर्यंत पास करण्यासाठी अटेम्प्ट निश्चित करण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे कोर्स पूर्ण करीत होते. नियमित अभ्यासक्रमाच्या अभावामुळे क्रॉनिक फेलियरच्या समस्या समोर येत होत्या.
अभ्यासू विद्यार्थी होणार डॉक्टर - रेग्युलेशन फॉर ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन 2012 नुसार तयार करण्यात आलेल्या नियमानुसार अटेम्प्ट फिक्स करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना फर्स्ट युनिव्हर्सिटी प्रोफेशनल एक्झामिनेशन केवळ चार अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. हा नियम लागू झाल्यामुळे अभ्यासू विद्यार्थी डॉक्टर बनू शकतील. तसेच यामुळे एमबीबीएसचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून दुस-या अभ्यासक्रमाकडे वळून पुन्हा एमबीबीएसकडे येणा-या विद्यार्थ्यांवर बंदी येऊ शकते.
असे होणार फायदे - कोर्स पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन असल्यामुळे विद्यार्थी जास्त अभ्यास करतील.
स्पर्धात्मक दृष्टिकोनातून अभ्यासक्रमात विद्यार्थी जास्त लक्ष देतील, त्यामुळे ठरलेल्या वेळेत एमबीबीएस पूर्ण होईल.
योग्य वयात विद्यार्थी डॉक्टर बनतील.
देशातील डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होईल.
डिग्रीवर फोकस - एमबीबीएस करणा-या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थी एमबीबीएस पासूनच पीजीची तयारी सुरू करीत होते. या कारणामुळे एमबीबीएसवरून त्यांचे लक्ष विचलित होत होते व ते अभ्यसातील नियमितता कमी करीत होते. पर्यायी त्यांचा क्लिनिकल पार्ट कमजोर होत होता. या नवीन नियमामुळे दबावात विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील. डॉ. आर.के. धाकड
आता ज्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. तेच विद्यार्थी डॉक्टर बनू शकतील. तसेच जे विद्यार्थी एमबीबीएस करण्यासाठी 10-12 वर्षे घेत होते. अशा विद्यार्थ्यांवर बंदी आणता येईल. अभ्यासक्रमादरम्यान गॅप घेणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो. त्यामुळे आता सलग नऊ वर्षात पदवी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा नियम उत्तम आहे. डॉ. वीणा अग्रवाल