आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘स्मार्ट सिटी पात्रतेसाठी मनपाचा लागणार कस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ‘स्मार्टसिटी’ योजनेत राज्यातील १० शहरांमध्ये जळगावचा विचार करण्यात अाला असून, ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब आहे. मात्र, हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणे तेवढेच कठीण आहे. मूलभूत सुविधांची वानवा असलेल्या आपल्या शहरात हायटेक सुविधा मिळणार असल्या तरी, त्यासाठी जो प्लॅटफॉर्म तयार हवा त्याची पूर्तता करणे गरजेचे ठरणार आहे. या योजनेसाठी जळगाव महापालिकेला एक परीक्षा द्यावी लागणार असून, त्यातील १३ प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे द्यावी लागतील. त्यात उत्तीर्ण झाल्यावरच जळगावची निवड शक्य होणार आहे.

‘काय असेल स्मार्ट सिटी?’ या प्रश्नाने अनेकांच्या डोक्यात घर केले आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत सोप्या शब्दांत या प्रश्नाचे उत्तर देऊन ‘स्मार्ट सिटी’ची व्याख्या स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या गरजेपेक्षा दोन पाऊल पुढे असेल असे शहर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून गणले जाणार आहे.

महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये जळगाव शहराचा समावेश होणे, हाच मोठा बहुमान मानला जाताेय. यामागे नक्कीच राजकीय, सामाजिक व्यावसायिक शक्तींचा हातभार असणे गरजेचे असते. परंतु, केवळ १० शहरांमध्ये समावेश असणे एवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने आता जळगाव मनपा लोकप्रतिनिधींची सत्त्वपरीक्षा सुरू होणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी केंद्राने काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब केला आहे. त्यात जे शहर निकष पूर्ण करू शकेल अशाच शहराचा पात्रता यादीत समावेश केला जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवड झाल्यास जळगावात २१ प्रकारच्या हायटेक सुविधा मिळू शकतील.

राजकीय पक्षांकडून घोषणा भरपूर, काम मात्र शून्य
गेल्याकाही वर्षांत राजकीय पक्षांकडून ३,२०० कोटींचा शहर विकासाचा आराखडा पूर्ण करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. त्यात शहरातील मूलभूत गरजा, अंतर्गत ड्रेनेज सिस्टिम, उच्च दाबाच्या जलवाहिन्या, रस्ते विकास, नाले विकास, शहर सुशोभिकरण, शैक्षणिक विकास अादी कामे करण्याचे अाश्वासन दिले हाेते. परंतु, आजमितीस एकाही कामाला प्रत्यक्षात सुरुवात हाेऊ शकलेली नाही. तसेच त्यांचा काेणताही प्रस्ताव तयार हाेऊ शकलेला नाही. शहरातील पाणीपुरवठा वितरण यंत्रणा जुनाट झाली असून, ठिकठिकाणी जलवाहिन्यांना गळत्या लागत आहेत. त्यामुळे जमिनीखालील जलवाहिन्यांची आखणी नव्याने करणे गरजेचे आहे.
घरकुल योजना अपूर्णच
१५वर्षांपूर्वी घरकुल योजना राबवण्यात आली. त्यात पिंप्राळा शिवाजीनगर भागात सुमारे चार हजारांपेक्षा अधिक घरकुलांचे वाटप झाले असून, ४५० घरकुलांचे बांधकाम सुरू आहे. तसेच न्यायालयात प्रलंबित असलेल्या घरकुलांची संख्या ९,८०८ आहे. ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ म्हणून जळगावचा नावलौकिक होण्यासाठी ही योजना पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. कारण अनेक ठिकाणी घरकुलांच्या इमारती अपूर्णावस्थेत आहेत.
रस्त्यांचीकामेही रखडली
शहराच्याहद्दीत सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी ६५ किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. १७२ किलोमीटर लांबीचे रस्ते सर्वसाधारण, तर १९५ किलोमीटर लांबीचे रस्ते कच्चे आहेत. शहरात २० वर्षांत रस्त्यांच्या विकासासाठी पाहिजे तसे प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे अाज रस्त्यांची समस्या सगळ्यात बिकट झाली असून, रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यांत रस्ते? असा प्रश्न उपस्थित होतो.
परीक्षेत असे विचारले जाऊ शकतात प्रश्न
-किती घरांमध्ये पक्के शौचालय आहे? {कर, भाड्याच्या माध्यमातून किती महसूल जमा होतो? -पाणीपुरवठा वितरण यंत्रणेवर किती खर्च होतो? {परिवहन व्यवस्थेची स्थिती काय? {तीन वर्षांपूर्वीच्या मंजूर योनांपैकी किती पूर्ण झाल्या? {३ वर्षांत किती महसूल गोळा झाला? {अंतर्गत स्रोतांच्या माध्यमातून महसुलाचे किती योगदान आहे? {ऑनलाइन तक्रार निवारणप्रणाली आहे काय? {योजनांवर होणाऱ्या खर्चाची माहिती वेबसाइटवर जाहीर केली जाते का? {आवश्यक सेवांमध्ये विलंब झाल्यास दंड. {स्थानिक संस्थांमध्ये पगाराचे वाटप. {२०१२-१३मध्ये खात्यांचे लेखापरीक्षण.
या बाबींची अपेक्षा
-जमिनींबाबत वाद योजनेत एकत्र जागेचा योग्य वापर व्हावा.
- वाहतूक ठप्प होणे, प्रदूषणाची समस्या नसणे, लहान-लहान भागांचा विकास. यामुळे नागरिक पायी जाऊन किंवा सायकलचा वापर करून कामे उरकू शकतील.
- योजनेत तास पाणी वीजपुरवठा, वाहतुकीसाठी वेगवेगळे रस्ते, शाळा हॉस्पिटलच्या सुविधा आणिशहरात वाहतूक सुविधेची दर्जेदार यंत्रणा.
१३ प्रश्नांची परीक्षा
केंद्रसरकारच्या शहरी विकास मंत्रालयाने या योजनेसाठी गाइडलाइन तयार केली आहे. त्यानुसार १३ प्रश्न विचारले जाणार असून, त्यात १०० गुणांचा विचार होईल १३पैकी प्रश्नांसाठी जास्तीत जास्त १० आणिबाकीच्या प्रश्नांसाठी गुण असतील. अव्वल येणाऱ्या शहरांची पुढच्या फेरीसाठी निवड होईल
बातम्या आणखी आहेत...