आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमसीटीएस’ रोखणार अवैध गर्भपात, गर्भवती महिलांचे होणार ट्रॅकिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रत्येक गरोदर महिलेची नोंदणी करून तिला देण्यात आलेल्या मदर अॅण्ड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टीम्सचा (एमसीटीएस) आता अवैध गर्भपात रोखून मुलींचा जन्मदर उंचावण्यासाठी प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. यावर राज्य केंद्र शासनाच्या पातळीवरून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात दर हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण ८८४ पर्यंत आहे. मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत बीडनंतर जळगाव राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. हे चित्र बदलण्यासाठी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सोनोग्राफी मशिन्सला अॅक्टिव्ह ट्रॅकर बसवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डॉक्टरांच्या विरोधामुळे तो अंमलात येऊ शकला नाही. याबाबत केंद्रस्तरीय समिती निर्णय घेणार आहे. तत्पूर्वी एमसीटीएसचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. सिव्हिल, प्राथमिक आरोग्य केंद्र मनपा रुग्णालयात गरोदर महिलांची नोंदणी करण्यात येते. नोंदणी केल्यानंतर मदर अॅण्ड चाइल्ड ट्रॅकिंग नंबर देण्यात येतो.

नवीन प्रणाली फायदेशीर
मातृसुरक्षेच्या दृष्टीने गरोदर महिलेची संपूर्ण नऊ महिन्यांच्या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मनपाच्या दवाखान्यांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. प्रत्येक गरोदर महिलेला मदर्स अॅण्ड चाइल्ड ट्रॅकिंग नंबर देण्यात येतो. त्यानंतर तपासणीचे कार्ड तयार केले जाते. त्यावर वेळोवेळी लक्ष ठेवले जाते. त्यामुळे ही नवीन ट्रॅकिंग सिस्टिम खूपच फायदेशीर आहे. तसेच या प्रणालीचा अवैध गर्भपात रोखण्यासाठी प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. परिणामी भविष्यात अवैध गर्भपातच्या घटना या कमी होण्यास मोठी मदत होईल. डॉ.राजकुमारसूर्यवंशी, प्रभारीजिल्हा शल्यचिकित्सक

नेमके काय आहे ‘एमसीटीएस’
गरोदरमहिलेची नोंदणी केल्यानंतर त्या महिलेला मदर अॅण्ड चाइल्ड ट्रॅकिंग नंबर देण्यात येतो. त्याचबरोबर तपासणीचे कार्ड तयार करण्यात येते. त्या महिलेचे हिमोग्लोबीन, आयर्न, रक्त-लघवी इतर चाचण्या करण्यात येतात. सुदृढ मातृत्वासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतात. एमसीटीएसच्या माध्यमातून गरोदर महिलांची माहिती शासनाकडे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संकलित होते.

कसे करणार ट्रॅकिंग?
एमसीटीएसमुळेसंपूर्ण नऊ महिन्यांच्या कालावधीत गरोदर महिलांच्या तपासण्या, सोनोग्राफी आदींबाबत माहिती सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाला कळणार आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य सेवक, सहायक हे गरोदर महिलांवर नऊ महिने लक्ष केंद्रित करणार आहेत. अचानक एखाद्या गरोदर महिलेचा नऊ महिन्यांपूर्वी गर्भ नाहीसा झाला. प्रसूती झाली. याबाबत मदर ट्रॅकिंग नंबरच्या आधारे कळणार आहे. त्या महिलेची प्रसूती झाली काय? गर्भपात तर केला नाही ना? याबाबत चौकशी करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...