आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबभाऊ अन् मी प्रश्न मांडणारे; गिरीशभाऊ साेडवणारे - खडसे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामसेवकांच्या जिल्हा मेळाव्यात माजी मंत्री एकनाथ खडसे जलसंपदामंत्री व्यासपीठावर शेजारी बसले होते. इतर वेळी ते एकमेकांशी दिलखुलास बातचीत करतात. परंतु, रविवारी ते फारसे बोलले नाही. - Divya Marathi
ग्रामसेवकांच्या जिल्हा मेळाव्यात माजी मंत्री एकनाथ खडसे जलसंपदामंत्री व्यासपीठावर शेजारी बसले होते. इतर वेळी ते एकमेकांशी दिलखुलास बातचीत करतात. परंतु, रविवारी ते फारसे बोलले नाही.
जळगाव - मंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर वर्षांच्या खंडानंतर व्यासपीठावर एकत्र अालेले जलसंपदामंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे अाणि शिवसेना अामदार गुलाबराव पाटील यांच्यात ग्रामसेवकांच्या जिल्हा मेळाव्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. तिन्ही नेत्यांनी नेहमीच्या अाक्रमक शैलीत राजकीय भाष्य करणे टाळले. मात्र, अामदार गुलाबभाऊ अाणि मी प्रश्न मांडणारे अाहाेत अाणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे प्रश्न साेडविणारे अाहेत. असा चिमटा खडसे यांनी महाजन यांना काढला.

राजकीय अाणि प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचा अाणि शेवटचा घटक असलेल्या ग्रामसेवकांचा जिल्हा मेळावा रविवारी जिल्हा बँकेच्या सभागृहात झाला. या मेळाव्यास माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, अामदार गुलाबराव पाटील उपस्थित हाेते. जिल्हा बँकेच्या सभागृहात तब्बल दाेन वर्षांनी तिन्ही नेते व्यासपीठावर एकत्र अाले. तिन्ही नेत्यांनी सावध पवित्रा घेत राजकीय वक्तव्य करणे टाळले; परंतु राजकीय स्वभावाने तिघांनीही एकमेकांना अाेझरते चिमटे काढले. या वेळी बाेलतांना गुलाबराव पाटील म्हणाले, ग्रामसेवक, तलाठी अाणि शिक्षक या त्रिसूत्रीवर गावाचे भवितव्य अाणि राजकारण अवलंबून असते. ग्रामसेवक, तलाठी यांची ताकद माेठी असते. ते थैलीत गाव घेऊन फिरतात. त्यांच्यावरच पुढाऱ्याचे राजकारण अवलंबून असते. तुमच्या काही समस्या अाहेत. त्या मी मांडण्याचा प्रयत्न करताे. मी प्रश्न मांडणारा अाहे अाणि येथे बसलेले दाेन्ही मंत्री प्रश्न साेडविणारे अाहेत. अाधीच दाेन भाऊ व्यासपीठावर असताना तिसऱ्या भावाने बाेलण्याची गरज नाही. गुलाबरावाच्या या विधानाचा धागा पकडून खडसे यांनी महाजन यांना टाेला लगवला. ते म्हणाले, अामदार गुलाबराव भाऊ अाणि मी प्रश्न मांडणारे अाहाेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे प्रश्न साेडविणारे अाहेत.

पुढे वाचा...
> पंकजा मुंडेंशी चर्चा
> काळ लाेटला; पण खडसेंच्या वेदना त्याच
> कामे करणारेच चुका करतात
> महाजन प्रश्न साेडवतील
बातम्या आणखी आहेत...