आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical College In Parbhani Demanding More Money

परभणीच्या मेडिकल कॉलेजकडून जादा पाच लाख शुल्काची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - परभणी येथील सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून निर्धारित शुल्कापेक्षा पाच लाख रुपये जादा मागितल्याने यासंदर्भात जळगावातील दोन पालकांनी परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे.

जळगावातील मधुकर पाटील यांचा मुलगा पंकज याने एमडीएस या पदवी अभ्यासक्रमासाठी धन्वंतरी महाविद्यालयात शासकीय कोट्यातून प्रवेश मिळवला. त्याला एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे वीस रुपये शुल्क भरायचे होते. मात्र महाविद्यालयाकडून त्याला 2 लाख होस्टेलसाठी व 3 लाख रुपये सुरक्षित जमा म्हणून असे 5 लाख रुपये अतिरिक्त मागणी होत आहे. तसेच शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी इस्टीमेट देण्यासही नकार देण्यात येत आहे. पंकजचे वडील मधुकर पाटील यांनी शुक्रवारी या संदर्भात परभणीच्या जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. आता त्यांच्या कारवाईकडे पालकांचे लक्ष आहे.


दिग्गज संचालक असल्यामुळे
सरस्वती धन्वंतरी दंत महाविद्यालयाचे संचालक असलेले डॉ.प्रफुल्ल पाटील हे राष्ट्रवादी काँगे्रसचे पदाधिकारी आहेत. डॉ.पाटील यांच्या पत्नी विद्या पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरचिटणीस आहेत त्या देखील महाविद्यालयाच्या
संचालिका आहेत.

डॉ.पाटील सिनेट सदस्य
डॉ.पाटील यांना नुकतेच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठावर सिनेट सदस्य म्हणून पाठविण्यात आले आहे. त्यांच्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शिफारस केली आहे. या निवडीतही डॉ.पाटील यांनी खोटा रहिवासी पुरावा दिल्याचे उघड झाले आहे.

नियमानुसार शुल्क आकारणी
दंत महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारित केंद्रीय प्रवेश पद्धतीतून होत आहे. शासनाच्या शिक्षण शुल्क निर्धारण समितीने लागू केलेले शुल्कच महाविद्यालय घेत आहे. प्रवेश शुल्क हे डीडी स्वरूपात स्वीकारले जात असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील म्हणाले.