आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव शहरात खासगी रुग्णालयात नर्सची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भुसावळ येथील रहिवासी असलेल्या दोन वर्षांपासून येथील जळगाव क्रिटिकल केअर ट्रॉमा सेंटरमध्ये नर्सचे काम करणाऱ्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री वाजता उघडकीस आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
काजल राजकुमार कुरकुरे (वय २०, रा.आराधना कॉलनी, भुसावळ ) असे मृताचे नाव आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून येथील जळगाव क्रिटिकल केअर ट्रॉमा सेंटरमध्ये कामाला होती. ती क्रिटिकल सेंटरच्या इमारतीत वरच्या मजल्यावरील नर्सच्या स्टाफ रूममध्ये राहायला होती. दररोज वेळेवर ड्युटीला येणारी काजलला उशीर झाल्याने सहकारी कर्मचारी तिला बोलावण्यासाठी गेली असता दरवाजा उघडत नव्हती. तपास केला असता काजलने गळफास लावल्याचे उघडकीस आले.
जिल्हापेठ पोलिसांनी पंचनामा करून रात्री उशिरा आकस्मात मृत्यूची नोंद केली. मृत काजलच्या पश्चात आई-वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे. तिने नर्सिंगचा कोर्स केल्यानंतर ट्रॉमा सेंटर येथे नोकरीला लागली होती. नोकरी करून तिने नुकतीच बारावीची परीक्षाही दिल्याचे सांगण्यात आले. आत्महत्या करण्यामागचे कारण मात्र कळू शकले नाही. या वेळी काजलचे वडील, काका, मामा आदी नातेवाईक आले होते.