आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय अधिकार्‍यांची निवड होणार थेट; रिक्त पदे भरणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍याची निवड आतापर्यंत सेवाज्येष्ठतेप्रमाणे होत होती. पण हे एकाकी पद असल्याने ही निवड सेवाज्येष्ठतेनुसार नव्हे तर जाहिरात काढून करण्यात येणार आहे. पालिकेतील प्रभारी प्रमुख वैद्यकीय अधिकार्‍यासह तीन वरिष्ठ डॉक्टर पुढील सहा महिन्यांत सेवानिवृत्त होत असून रिक्त जागा भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत.

शहरात सात ठिकाणी रुग्णालयातील रिक्त पदांचा विषय दोन वर्षापासून गाजत असला तरी प्रशासनाकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रभारी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मला शर्मा यांच्यासह, वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय राव, डॉ. विजया अटवाल निवृत्त होत आहेत. रुग्णालयात यापूर्वीच 43 पदे रिक्त आहेत, त्यांच्या निवडीचा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही. एकाच वेळी संपूर्ण रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी निवृत्त झाले तर रुग्णसेवेवर मोठा ताण पडणार असल्याने पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यानुसार प्रशासनाकडून भरतीप्रक्रियेबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. यात एक प्रमुख वैद्यकीय अधिकारी, पाच वैद्यकीय अधिकारी, दोन बीएएमएस डॉक्टर यांचा समावेश राहणार आहे.

प्रमुख पदे भरणार
रुग्णालयातील रिक्त असलेल्या पदांपैकी प्रमुख वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे प्राधान्याने भरण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासकीय पातळीवर मान्यता व अन्य प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. भालचंद्र बेहरे, उपायुक्त