आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Medically Admission Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अ‍ॅड. बेंडाळेंच्या मुलीची पुण्यात फसवणूक, मेडिकलला प्रवेशासाठी घेतले २० लाख रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव/पुणे- पुण्यातील एका महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून जळगाव वकील संघाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. बिपिन बेंडाळे यांच्या मुलीला २० लाख रुपयांत गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी यतीन दिनेश शहा (वय २८) याला अटक केली आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.

पुणे येथील श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या अ‍ॅड. बेंडाळे यांच्या मुलीशंी यतीन शहा याने दोन साथीदारांच्या मदतीने जून महिन्यात संपर्क साधला होता. प्रवेश मिळवून देतो, असे सांगितले होते. मुलीने अ‍ॅड. बेंडाळे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून याबाबत माहिती दिली होती. प्रवेशाच्या कामासाठी २० लाख रुपये देण्याचा व्यवहार ठरला, दुसऱ्याच दिवशी बेंडाळे यांनी त्यांचे पुण्यातील जंगली महाराज रोडवर राहत असलेले मामा आर.जी. राणे यांना यतीन शहाला प्रवेशाचे काम करून देण्यासाठी दोन लाख देण्यास सांगितले. उर्वरित १८ लाख यतीनला ९ जून २०१४ रोजी पुण्यात जाऊन दिले. दरम्यान, २० लाख देऊनही मुलीला महाविद्यालयात प्रवेश मिळालाच नाही. या प्रकरणी अ‍ॅड.बिपिन बेंडाळे यांनी पोलिसांकडे शहाच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. यतीन शहा याला पुणे पोलिसांनी अटक करून सोमवारी कोर्टात हजर केले असता, त्यास दोन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली.
टोळी असण्याची शक्यता
पुणे हे राज्याचे शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. विविध अत्याधुनिक शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी पुण्यात राज्यासह देशभरातून विद्यार्थी येत असतात. यतीन शहा याने दोन साथीदारांच्या मदतीने ज्याप्रकारे २० लाखांत फसवणूक केली. त्याची गुन्हा करण्याची पद्धत सराईत गुन्हेगारासारखी असल्याने या फसवणूक प्रकरणामागे दोन ते तीन जण अथवा मोठी टोळी असावी, अशी शक्यता पुणे पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार तपास सुरू आहे.