आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिबायोटिक औषधांचा अधिक वापर घातकच!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सर्दी-खोकला या व्हायरससारख्या आजारांसाठी अ‍ॅँटिबायोटिक (प्रतिजैविक) औषधांच्या वाजवीपेक्षा जास्त वापरामुळे अ‍ॅँटिबायोटिक रेजिस्टंस वाढत जातो. यामुळे येणार्‍या काळात मोठ्या प्रमाणात अ‍ॅँटिबायोटिक औषधी वाया जाऊ शकते. कारण किरकोळ आजारांमध्ये घरात पडून असलेल्या औषधी घेण्याचे प्रमाण वाढल्याचा सूर वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त होत आहे.

सर्दी-खोकला यांसारखे बरेच आजार हे व्हायरसयुक्त असतात आणि ते दोन चार दिवसांत आपोआप बरे होऊन जातात. परंतु आपण अ‍ॅँटिबायोटिक औषध खाऊन या औषधांमुळेच आजार ठिक झाला, या भ्रमात असतो. याचा दुष्परिणाम असा होतो की, त्या अ‍ॅँटिबायोटिकविरुद्ध आपल्या शरीरातील बॅक्टेरिया (किटाणू, जिवाणू) मध्ये प्रतिरोधात्मक शक्ती येते. मात्र, भविष्यात अशा औषधीचा योग्य उपयोग होत नाही.
भविष्यात परिणाम उद्भवतात
४किरकोळ आजारांसाठी अँटिबायोटिक औषध घेतले नाही, तरी त्रास दोन दिवसांत आपोआप कमी होतो. परंतु रुग्णांची त्रास सहन करण्याची मानसिकताच नसते. तसेच रुग्ण डॉक्टरांनी दिलेल्या औषधीचा डोसही पूर्ण घेत नाही. परस्पर औषधी घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. अतिअँटिबायोटिक औषधांचे अधिक सेवन केल्यास अँटिबायोटिक रेजिस्टंस वाढत जातो. त्याचे परिणाम भविष्यात उद्भवतात.
- डॉ. निखिल पाटील, फिजिशियन
डॉ.सत्यजित रथ यांचेही हेच मत
दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इम्युनोलॉजीमध्ये कार्यरत वैज्ञानिक डॉ. सत्यजित रथ यांच्याशी भोपाळ येथे भास्करच्या ‘डीबी स्टार’ने चर्चा केली. त्यांनी अशी प्रवृत्ती च्ािंताजनक असल्याचे सांगत सर्दी, खोकला, ताप आदी झाल्यास आपण स्वत:च डॉक्टर बनतो आणि कोणत्याही औषधीच्या दुकानावर जाऊन अ‍ॅँटिबायोटिक खरेदी करतो. यामुळे शरीरातील बॅक्टेरियाची प्रतिरोधक शक्ती वाढत असल्याचेही ते म्हणाले.
घरात ठेवू नयेत अनावश्यक औषधे
वैज्ञानिक डॉ. रथ यांच्या म्हणण्यानुसार जर आपल्याला डॉक्टर काही अ‍ॅँटिबायोटिक औषध सेवनासाठी सांगत असतील तर तेवढी औषधी सेवन करावी जेवढी डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शनमध्ये लिहिली असेल. कमी अथवा जास्त सेवन करू नये. डॉक्टर पाच दिवसांची औषधी लिहितात तर आपल्यातील अनेक लोक दोन दिवस औषधी घेऊन बरे झाले म्हणून उर्वरित तीन दिवसांची औषधी भविष्यात वापरासाठी राखून ठेवतात. यामुळे केवळ दोन दिवसांची औषधी खाणार्‍या व्यक्तीच्या शरीरात बॅक्टेरिया रेजिस्टंस तयार होत जातो. तर घरात ठेवलेल्या अ‍ॅँटिबायोटिक