आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध विक्रीची नोंद मार्चपासून सक्तीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - फार्मासिस्ट बंधनकारक केल्यानंतर आता केंद्राने औषधी दुकानात प्रत्येक औषधीची नोंद करण्यासाठी रजिस्टर ठेवणे बंधनकारक केले आहे. यात डॉक्टर, रुग्णाचे नाव, औषधीची माहिती व बिल क्रमांक नमुद करावा लागणार आहे. हे रजिस्टर तीन वर्षांपर्यंत सांभाळून ठेवावे लागतील. 1 मार्चपासून राज्यात हा नियम लागू होणार आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने अधिसूचना जारी करून प्रत्येक औषधी दुकानात नोंद रजिस्टर ठेवणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार औषधी व सौदर्य प्रसाधने अधिनियम 1940 च्या नियम 1945 मध्ये सुधारणा करून अनुसुची एच 1 चा अंतर्भाव करण्यात आला आहे. बर्‍याचदा औषधामुळे रुग्णाला साइड इफेक्ट होतात. तसेच रिअँक्शन येते. तसेच औषधांचे नमुने फेल झाल्यास अशी औषधी कोणाला विक्री झाली आहे व ते पुन्हा ताब्यात घेण्यासाठी या कायद्याचा फायदा होणार आहे. यासाठी औषधी घेण्यासाठी आलेल्या रुग्णाचे नाव, औषधी लिहून देणार्‍या डॉक्टरांचे नाव, औषधी कोणती, किती दिली, बिलाचा क्रमांक व बिलाची तारीख ही माहिती विक्रेत्यांकडे नोंदवली जाईल. यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यास ती ताबडतोब परत मागवता येणार आहे.

46 औषधांचा समावेश
कायद्यातील नवीन बदलामुळे अनुसुची एच 1 मध्ये आता 46 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. अनुसूची एक्स मध्ये केटामाइन इंजेक्शन, स्वाइन फ्लूच्या औषधांची नोंद ठेवली जाते. तशीच नोंद एच 1 मध्ये राहणार आहे.