आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अाैषधीचा खप दुप्पट वाढला; १२ दिवसांत ४० कोटी उलाढाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - संपूर्णबाजार पेठेवर नाेटा रद्द झाल्यामुळे विपरीत परिणाम झालेला असताना मात्र अाैषधी विक्रीच्या क्षेत्रातील उलाढाल दुप्पट वाढली अाहे. १२ दिवसांत जिल्ह्यात सुमारे ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाली अाहे. एेरवी ही विक्री १५ ते २० काेटी असते. रुग्णांकडून नाेटा बदलाच्या हेतूने तब्बल तीन महिन्यांची अाैषधी खरेदी केली जात अाहे. यात हृदयविकार मधुमेहाच्या अाैषधीला अधिक मागणी अाहे. परिणामी अाेळखपत्र डाॅक्टरांचे प्रीस्क्रिप्शनशिवाय काेणालाही अाैषधी देऊ नये, असा फतवाच केमिस्ट संघटनेने काढला अाहे. त्यामुळे गेल्या दाेन दिवसात अाैषध विक्रेत्यांसाेबत रुग्णांचे वादाचे प्रमाणही वाढले अाहे.
नाेटा रद्द झाल्यानंतर त्याचे चांगले वाईट परिणामांची चर्चा रंगत अाहे. घरगुती वस्तंुपासून ते साेने बाजारात तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहारांवर परिणाम झाले अाहेत. सुटे पैसे नसल्याने मागणी घटल्याने भाजीपाला काही प्रमाणात स्वस्त झाला अाहे. तर वैद्यकीय क्षेत्रात मात्र याचा उलटा परिणाम पाहायला मिळत अाहे.

डाॅक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय अाैषधी देऊ नये
^सध्यारुग्णांकडूनएकाच वेळेस तीन महिन्यांची अाैषधी खरेदी करण्यात येत अाहे. यामुळे मधुमेह हृदयविकारासह अन्य अाैषधी विक्रीत दुप्पट वाढ झाली अाहे. त्यामुळे एकाच वेळी जादाची अाैषध खरेदी विक्रीचा प्रकार चुकीचा असल्याने केमिस्टने काळजी घ्यावी. रुग्णाची अाेळख डाॅक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय अाैषधी देऊ नये. सुनीलभंगाळे, अध्यक्ष, केमिस्ट असाेसिएशन

विक्रेते ठेवताय पुरावा
भविष्यातनाहक डाेकेदुखी हाेऊ नये म्हणून केमिस्ट संघटनेने अाैषध विक्रेत्यांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या अाहेत. रुग्णाने ५०० १००० ची नाेट दिल्यास तेवढ्या रकमेची अाैषधी अाहे का? याची पडताळणी करणे तसेच जुन्या नाेटा घेताना अाेळखपत्र घेणे डाॅक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय अाैषध देऊ नये, असा फतवाच काढला अाहे. जुन्या प्रीस्क्रिप्शनवर अाैषधी देता तारीख तपासून अाैषधी देण्याच्या सूचना करण्यात अाल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले.

रुग्णांची अपेक्षा अन् डाेकेदुखी
डाॅक्टरांनीजुन्या नाेटा घेण्यास नकार दिल्यानंतर अाता घरातील ५०० १००० रुपयांच्या नाेटा मार्गी लावण्यासाठी नागरिकांनी अाैषधी विक्रेत्या दुकानांकडे माेर्चा वळवला अाहे. मधुमेह हृदयविकाराच्या रुग्णांना दर महिन्याला हजाराे रुपयांची अाैषधी घ्यावी लागते. त्यामुळे अशा रुग्णांकडून अाैषध विक्रेत्यांकडे नेहमी लागणाऱ्या अाैषधीची चार महिन्यांसाठी खरेदी केली जात अाहे. यासाठी जुन्या नाेटांचा सर्रास वापर हाेताना दिसत अाहे. वास्तविक डाॅक्टरांनी एकाच महिन्याची अाैषधी दिलेली असताना रुग्ण मात्र दुकानदाराकडे तीन महिन्यांची अाैषधी देण्याचा अाग्रह धरत अाहेत. गेल्या काही दिवसांत हा प्रकार माेठ्याप्रमाणात वाढला अाहे.

१७०० जिल्ह्यातअाैषध विक्रेते
४००जिल्ह्यातहाेलसेल विक्रेते
२५०शहरातीलहाेलसेल विक्रेते
१५काेटीसरासरी उलाढाल महिन्यात

नाेटबंदीनंतर साठा करण्यास सुरूवात
नाेटबंदीच्या निर्णयानंतर रुग्णांनी अाैषधीचा साठा करून ठेवण्याचा प्रकार सुरू केल्यामुळे अाैषधीच्या विक्रीत दुप्पट वाढ झाली अाहे. जिल्हाभरातील १७०० अाैषध विक्रीच्या दुकानांमध्ये सुमारे १५ ते२० काेटींची उलाढाल हाेते. परंतु गेल्या १२ दिवसांत अाैषध विक्रीत सुमारे ३५ ते ४० काेटींची उलाढाल झाल्याचा दावा केमिस्ट संघटनेतर्फे करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...