आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Meetion In Mantralaya For Various Issues Of Dhule Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धुळे मनपाच्या प्रश्नासाठी मंत्रालयात बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - धुळे महापालिकेसह दोंडाईचा, शिरपूर नगरपालिका आणि शिंदखेडा नगरपंचायतीच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढावा बैठकीत दिली.

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उदय सामंत हे शहरात आले होते. स्पध्रेच्या उद्घाटनानंतर त्यांची शासकीय विर्शामगृहात महापालिका, नगरपालिकांची आर्थिक परिस्थिती आणि पदांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महापौर मंजुळा गावित, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापालिका आयुक्त दौलतखान पठाण, दोंडाईचा नगरपालिकेचे नगराध्यक्ष विक्रम पाटील, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अशोक करंजकर, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड, रवींद्र देशमुख, किरण पाटील, किरण शिंदे, शिरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश गिरी, जिल्हा प्रकल्प अधिकारी रोशन मकवाणे आदी उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री उदय सामंत यांनी 2011च्या जनगणनेनुसार महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये किती अस्थायी पदे स्थायी होतील याचा आढावा घेतला. तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांची आर्थिक परिस्थिती आणि अग्निशमन यंत्रणेची माहिती घेतली.


माजी सैनिकांना घरपट्टी माफ
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांचे शासनाकडे प्रलंबित असलेली प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्यात येतील. नगरपालिका क्षेत्रात राहणार्‍या माजी सैनिकांना घरपट्टी माफ करावी, अशी सूचनाही मंत्री सामंत यांनी बैठकीत केली.