आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरोग्य शिबिराचा पॅटर्न राज्यातही राबवू; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विविध आजारांवर उपचारासाठी आलेल्या हजारो रुग्णांवर एकाच ठिकाणी मोफत उपचार व्हावेत, यासाठी राबवलेले जळगावातील महाआरोग्य शिबिर ही केवळ रुग्णसेवा नाही, तर राष्ट्रसेवेचा उपक्रम आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे सामान्य व्यक्ती अाजारांवर जास्त खर्च करू शकणार नाही. यामुळे जळगावातील महाआरोग्य शिबिराचा हा पॅटर्न राज्यभरात राबवण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात आयोजित केलेल्या महाअाराेग्य शिबिराचे उद््घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री म्हणाले, विविध आजारांवर उपचार करणाऱ्या राज्यातील नामवंत डॉक्टरांचे पथक जळगावात अाले अाहे. माेठ्या संख्येतील रुग्णांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करणे, ही सोपी गोष्ट नाही. मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. तेथे तसेच संपूर्ण राज्यभरात असे महाआरोग्य शिबिर शासनाकडून राज्यभर घेतले जाईल. या वेळी आरोग्यमंत्री दीपक सावंत, अर्थ नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, स्वच्छता पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदामंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.

शिबिरात पहिल्या दिवशी तीन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातील ३०० पेक्षा जास्त रुग्णांवर येत्या तीन दिवसांत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल. त्यांना अाैषधीही देण्यात येईल.