आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूण तलावाच्या पाण्याचा ओघ घटल्यानंतर फुटलेल्या तलावास बांध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूणतलावाच्या सांडव्यालगत असलेला कच्चा बांध फुटल्याने तलावातून लाखाे लिटर पाणी वाहून जात असल्याने मंगळवारी पालिकेच्या अभियंत्यांनी गळतीची पाहणी करून पाण्याचा ओघ ओसरल्यावरच त्याची दुरूस्ती करता येणे शक्य असल्याचे या पथकाने स्पष्ट केले आहे. ‘
बांध फाेडून मेहेरूण तलाव सुटला धाे-धाे’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली. पालिका अभियंत्यांच्या पथकाने सकाळीच तलावाकडे धाव घेवून पाहणी केली. तलावावरील बाजूने अजूनही पाण्याचा स्त्रोत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. हा प्रवाह काही प्रमाणात कमी झाल्यावरच फुटलेल्या बांधाच्या ठिकाणी मुरूम मातीचा भराव करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

मेहरूण तलाव अतिवृष्टीनंतर ओसंडून वाहू लागला आहे. तलावाच्या सांडव्याच्या बाजूने काँक्रिटच्या बंधाऱ्यालगत असलेल्या दुसऱ्या चारीच्या बांधाला भगदाड पडले आहे, यातून निघणारे पाणी नाल्याला मिळत आहे. दुसरीकडे तलावाच्या ब्रिटिशकालीन बांधावर बसवलेल्या फ्लाेटर व्हाॅल्व्हमधून पाणीगळतीचे प्रमाण दुपटीवर गेले आहे. पािलकेचे उपअभियंता सुनील भोळे, प्रभाग अधिकारी सुशील साळुंखे, कनिष्ठ अभियंता प्रकाश पाटील, दिनेश चौधरी, भास्कर भोळे तसेच जैन इरिगेशनच्या प्रतिनिधींनी मंगळवारी तलावाच्या बांधाची पाहणी केली. तलावाच्या दक्षिण बाजूने अजूनही पाणी येत असल्याने तलावाची पातळी कमी झालेली नाही, असे पालिका अभियंत्यांचे म्हणणे आहे. प्रवाह सुरू असल्याने त्यात लगेच मुरूम टाकला तरी तो वाहून जाईल, किंवा बांध केला तरी सिमेंटच्या सांडव्यावरून पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह कमी होण्याची थाेडी वाट पाहून मग भराव टाकण्यात येणार आहे.

प्रवाह थांबल्यावर बांध घालणे योग्य.....
*तलावातयेणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. अशा परिस्थितीत कच्चा बांध घालणे अवघड आहे. थाेडा प्रवाह कमी झाला की, लगेच हे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी जैन इरिगेशनही मदत करण्यास तयार आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल. सुनीलभोळे, उपअभियंता