आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरूणचे सुशाेभिकरण रद्द; ‘गणेश घाट’चा प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव ; मेहरूण तलाव माेजणीला सातत्याने हाेणारा उशीर पाहता सुशाेभिकरणासाठी मंजूर निधी परत जाण्याचे संकेत मिळाले हाेते. त्यामुळे निधी वाचवण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने सुशाेभिकरणाचा प्रस्ताव रद्द करत अाता थेट तलावाच्या काठी ‘गणेश घाट’ तसेच भवानीमाता मंदिराचा परिसर सुशाेभिकरणाचा निर्णय घेतला अाहे. त्यासाठी शुक्रवारी तातडीने प्रस्ताव तयार करून सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात अाला अाहे.
सुमारे दीड वर्षापूर्वी डीपीडीसीतून मनपाला काेटींचा निधी मंजूर झाला हाेता. त्यातून मेहरूण तलावाचे सुशाेभिकरण करावे, असा निर्णय घेण्यात अाला हाेता. परंतु, नाेव्हेंबर २०१४मध्ये मेहरूण तलावाच्या काठावर अतिक्रमण असल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणली हाेती. यासंदर्भात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी तलावाकाठचे अतिक्रमण माेजणीचे अादेश दिले हाेते.
अादेश दिल्यापासून अाज तब्बल एक वर्ष उलटले अाहे. परंतु, माेजणीचे काम पूर्ण हाेऊ शकलेले नाही. परिणामी मेहरूण तलावाचे सुशाेभिकरणही हाेऊ शकलेले नसल्याने सुशाेभिकरणासाठी मिळालेला निधी परत जाण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. याबाबत चाहूल लागल्याने महापालिकेने तातडीने शुक्रवारी सुशाेभिकरणाएेवजी नव्याने प्रस्ताव तयार करून ताे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला अाहे.

नाशिकच्या धर्तीवर घाटची निर्मिती
नदीकाठच्याअनेक देवस्थानांच्या ठिकाणी घाट उभारण्यात अालेले अाहेत. त्यामुळे नागरिकांना थेट पाण्यात उतरण्यासाठी पायऱ्या करण्यात अालेल्या असतात. नाशिक येथे कुंभमेळ्याच्या निमित्ताने अशाच स्वरुपाचे घाट उभारण्यात अाले अाहेत. तसाच घाट मेहरूण तलावाच्या काठावर तयार करण्यात येणार अाहेत. सध्या तलावाच्या एका बाजूला बंधारा तयार करण्यात अाला अाहे. त्याच ठिकाणी घाट तयार करण्यात येणार अाहे. त्यामुळे नागरिकांना तलावाच्या काठी बसण्याची उत्तम साेय हाेणार अाहे. तसेच दुर्घटनाही टाळता येणार अाहे. त्याचप्रमाणे तलावाजवळील भवानीमाता मंदिराजवळ सुशाेभिकरण करण्यात येणार असून लहान स्वरुपात बगिचा तयार करण्यात येणार अाहे. त्यामुळे तलावाचे प्रदूषणापासून संरक्षणदेखील हाेणार अाहे. यासाठी ९८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला अाहे.
फाइल फोटो

अतिक्रमणाचा त्रास नाही
गतवर्षभरापासून प्रशासन तलाव परिसरातील अतिक्रमण माेजणीत गुंतले अाहे. अद्यापही माेजणीची प्रक्रिया कारवाई हाेऊ शकलेली नाही. त्यामुळे महसूल विभागाच्या भरवशावर मनपाकडून निधी परत जाण्यापेक्षा मनपाच्या वहिवाटीत तसेच मालकीच्या जागेवर घाट उभारण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे.