आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा: दुसऱ्या दिवशी मेहरूण तलावाच्या दक्षिणेकडील शेतांची माेजणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भूमीअभिलेख विभागामार्फत दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी मेहरूण तलावाच्या दक्षिणेकडील शेतांची माेजणी करण्यात अाली. तलावाला लागून असलेल्या शेत हद्दीच्या मदतीने वहीवाट गृहीत धरून माेजणीची प्रक्रिया सुरू केली अाहे.
मेहरूण तलावाचे क्षेत्र माेजण्यासाठी तलाव भाेवतालच्या सर्व्हे क्रमांकाची माेजणी करावी लागणार अाहे. तलावाची हद्द मिळत नसल्यामुळे माेजणीसाठी मूळ पुरावे शाेधण्यात भूमी अभिलेख विभागाने तलावापासून ५०० मीटर अंतरावरील क्षेत्राची माेजणी सुुरू केली अाहे. रायसाेनी यांच्या फार्म हाऊसमागील शेताच्या वहीवाटीनुसार हद्दी मिळून अाल्या अाहेत. वरळी, दगड, शेतांचे बांध यांचा अाधार घेत चुना टाकून त्या पाॅइंटची माेजणी करण्यात येत अाहे. दक्षिणेकडून माेजणीला प्रारंभ झाला असून गुरुवारी पूर्वेकडील शेतांचे मूळ क्षेत्र माेजणी केले जाईल. या माेजणीनंतर हद्दी निश्चित हाेतील.
मेहरूण तलाव परिसरातील शेताची माेजणी इलेक्ट्रॉनिक टाेटल स्टेशनद्वारे करताना भूमिअभिलेख विभागातील कर्मचारी.

१० दिवसांचाअवधी : तलावाच्यासभाेवताली चारही बाजूंनी माेजणी केल्यानंतर तलावाचे मूळ क्षेत्रफळ कळून येईल. संपूर्ण क्षेत्र माेजण्यासाठी १० िदवसांचा अवधी लागणार अाहे. माेजणीनंतर तलावाच्या हद्दी निश्चित केल्या जाणार असून वहिवाटीनुसार माेजणी करताना हद्दीचे पुरावे देण्यासाठी भूमिअभिलेख विभागाला स्थानिक शेतकऱ्यांची मदत हाेत अाहे