आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरुण तलाव सुशोभिकरण; महापौरांचे आयुक्तांना पत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण तलावाच्या सुशोभिकरण व मजबुतीकरणासाठी केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनेतून निधी मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापौर राखी सोनवणे यांनी यासंदर्भात आयुक्तांना पत्र दिले आहे. तलावाचे नव्याने मोजमाप करून प्रस्ताव तयार करण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे.
मेहरूण तलावाच्या आजूबाजूला वस्ती वाढत चालली आहे. दररोज सकाळ-संध्याकाळ तलावाकाठी फिरण्यास येणा-यांची संख्याही मोठी आहे. तलावात विविध पक्षी विहारासाठी येत असतात. मध्यंतरीच्या काळात तलावात उडी घेऊन काही जणांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे तलावाच्या आजूबाजूस सुरक्षा व्यवस्था करणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आल्याने महापौर राखी सोनवणे यांनी आयुक्तांना पत्र देत तलाव सुशोभिकरणाची मागणी केली आहे.
यासाठी केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार शहरी भागातील तलावांचे सुशोभिकरण, सुरक्षा व त्याच्या संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार करून तो केंद्र व राज्य शासनाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात यावा अशा सूचनाही दिल्या आहेत.